Jayakwadi Dam Water increased : जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ; वाचा आजची ताजी आकडेवारी

Jayakwadi Dam Water Level Today : गेल्या आठवडाभरात जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 10 ते 12 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बऱ्याच शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
Jayakwadi Dam Water Level Today
Jayakwadi Dam Water Level TodaySaam TV
Published On

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

दुष्काळाने तहानलेल्या मराठवाड्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात धरणाचा पाणीसाठा तब्बल 10 ते 12 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बऱ्याच शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे नद्या-नाल्यांना मोठा पूर आला. परिणामी नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात तब्बल 85.33 टक्के इतका जलसाठा जमा झाला. त्याचबरोबर काश्यपीत 58 टक्के, गौतमी गोदावरीत 90, आळंदीत 91 टक्के आणि पालखेड धरणात 68 टक्के पाणी जमा झालं.

Jayakwadi Dam Water Level Today
Weather Alert : विदर्भ-मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून तब्बल 6 जिल्ह्यांना अलर्ट

जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू

धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढल्याने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या काळात नांदूरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीत करण्यात आलेला पाण्याचा विसर्स 54 हजार क्युसेकवर पोहोचला होता. त्यामुळे जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam Water Level) पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. परंतु, मंगळवारनंतर पुन्हा पावसाने उसंत घेतली.

अधूनमधून रिपरिप होत असली तरी पावसाचा जोर कमी झाला. याचा परिणाम जायकवाडीकडे धरणाकडे झेपावणाऱ्या पाण्यावर झाला. सध्या नांदूरमध्यमेश्वरचा विसर्ग सध्या 5 हजार क्युसेकवर आला आहे. यामध्ये दारणा धरणातून 2001, भावली 208, कडवा 413, गंगापूर 951 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जायकवाडी धरणात सध्या किती पाणीसाठा?

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हासह संपूर्ण मराठवाड्याला पाणीपुरवठा करून तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 28 टक्क्यांवर गेलाय. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह वरच्या धरण समूहातून गोदावरी नदी पात्रात 7 हजार 692 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.

सध्या 1505.45 फूट इतकी पाणी पातळी आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत आता झपाट्याने वाढ होत चालली. दरम्यान, ही आवक बघता पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार आहे. दरम्यान, जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असून त्यासाठी आता 735 कोटी रुपयांचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

जायकवाडीच्या डाव्या कालव्याची होणार दुरुस्ती

लवकरच याला मंजुरी मिळेल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या दोन कालव्याची निर्मिती करण्यात आली. त्यापैकी डावा कालवा हा सुमारे 208 किलोमीटर लांब असून निर्मिती झाल्यापासून एकदाही दुरुस्ती झाली नव्हती. कालवा दुरुस्तीचा प्रस्ताव दिल्याने पाण्याची वाहन क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिकचे पाणी मिळू शकेल.

Jayakwadi Dam Water Level Today
Heavy Rain Alert : महाराष्ट्रासह 22 राज्यांना आज अतिमुसळधार पावसाचा इशारा; वाचा कुठे कुठे कोसळणार पाऊस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com