अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. परिणामी मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी जलाशयातील पाण्याची आवक वाढली आहे. पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने छत्रपती संभाजीनगर, जालनासह जवळपास ४०० गावांचा पाणीप्रश्न मिटलाय.
पाणीपुरवठा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा (Jayakwadi Dam Water Lavel) पाणीसाठा आज बुधवारी (ता 14 ऑगस्ट)30 टक्क्यांवर पोहचला आहे. यंदा मराठवाड्यात फारसा समाधानकारक पाऊस झाला नाही. मात्र, मागच्या आठवड्यात नगर आणि नाशिक जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे तेथील प्रकल्प भरले आहेत.
त्यामुळे या प्रकल्पांमधून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे साडेचार टक्क्यांवर असलेला जायकवाडी जलाशयाचा पाणीसाठा 30 टक्के इतका झाला आहे. मात्र, मराठवाड्यात अद्यापही प्रकल्प आणि धरणात पाणी जमा होईल असा मोठा पाऊस झाला नसल्याने अनेक धरणे कोरडीच आहे.
जायकवाडीच्या या साठ्यामुळे भविष्यात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जालनासह जवळपास 400 गावे, काही तालुक्याची शहरे, उद्योगाच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त आज जायकवाडी धरणावर आकर्षक अशी तिरंगा रंगांमध्ये लाइटिंग करण्यात आली आहे. ही रोषणाई नागरिकांना आकर्षित करीत आहे.
जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यावर मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी मिळेल याची दक्षता घ्या, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
त्याचबरोबर जिथे जलवाहिन्या नाहीत तिथे जलवाहिन्या टाका आणि प्रत्येक ठिकाणच्या नळाचे सर्वेक्षण करून बेकायदा नळ जोडनी संदर्भात कारवाई करा, असंही खंडपीठाने महापालिकेला सांगितलं आहे. शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचे काम पूर्ण होईपर्यंत काँक्रिटीकरण करू नये किंवा परवानगी देऊ नये, असंही खंडपीठाने म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.