जालना : बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना माध्यम प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. या वर्षी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण धरण परिसर हिरवाई ने नटला आहे. तर त्यातच धरणक्षेत्रात असणाऱ्या पाणी साठ्याने ही आकाशी रंग धारण केलाय आणि त्यातच सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याची पांढरीशुभ्र छटा या धरणाच्या सौंदर्यात आणखीच भर घालत आहे.
याच धरणाची विहंगम अशी खास दृष्ये छायाचित्रकार संतोष वरकड यांनी टिपली आहेत. १९६५ मध्ये ८१ लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या धरणाची उंची १७.६८ फूट आहे. तर लांबी ८ किलोमीटर आहे. धरणाचा एकूण पाणी साठा १५.३९ द.ल.घन मीटर इतका आहे.
धरणाखाली असलेल्या लागवडीयुक्त अशा ५ हजार २८३ हेक्टर क्षेत्राला या वर्षी फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केल्या जात आहे, तर तालुक्यातील २० गावाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहरी धारण क्षेत्रात असल्याने पाण्याचा प्रश्न ही मार्गी लागला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.