Pune Breaking : अखेर पुण्यातील शाळा सोमवार पासून सुरु!

येत्या सोमवार (४ ऑक्टोबर) पासून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Pune Breaking : अखेर पुण्यातील शाळा सोमवार पासून सुरु!
Pune Breaking : अखेर पुण्यातील शाळा सोमवार पासून सुरु!साम टीव्ही
Published On

पुणे : राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारने सकारात्मकता दर्शवून दिनांक ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतू, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळा सुरु होणार कि नाही याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. महापालिकेकडून शाळा सुरु करण्यासंदर्भातील कोणत्याही प्रकारची अधिकृत भूमिका आतापर्यंत समोर आली नव्हती. कोणत्याही प्रकारचे आदेश महापालिकेने न दिल्यामुळे पालकांमध्ये शाळा सुरु होणार कि नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते.

हे देखील पहा :

राज्यातील इतर महत्वपूर्ण शहरांसह, ग्रामीण भागात देखील शाळा सुरु होणार असून, मुंबई पाठोपाठ पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील शाळा सुरू होणार हे निश्चित झाले आहे. शाळा सुरु करण्याबाबत पुणे महापालिका द्विधा मनस्थितीत असल्याचे जाणवत होते. दरम्यान, साम टीव्हीने शाळा सुरु करण्यासंदर्भातील मुद्दा उचलून धरल्यानंतर पुणे मनपा कडून अधिकृतरित्या शाळा सुरु करण्याबाबतचे आदेश अखेर आज पारित केले आहेत. येत्या सोमवार (४ ऑक्टोबर) पासून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून वर्ग भरवण्यात येणार आहेत.

Pune Breaking : अखेर पुण्यातील शाळा सोमवार पासून सुरु!
मराठा क्रांती मोर्चाकडून सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन!

शाळा सुरु करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना :

१) शाळेमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरणासाठी, Thermometer, Thermal Scanner / Gun Pulse Oximeter, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादि आवश्यक वस्तू उपलब्ध असाव्यात.

२) शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण नियमितपणे करण्यात यावे. तसेच याबाबतची शाळा व्यवस्थापनाने नियमितपणे पडताळणी करणे बंधनकारक राहील.

३) शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ साठीची ४८ तासापूर्वीची RT-PCR चाचणी बंधनकारक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळेत दप्तरी ठेवण्यात यावे. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दर १५ दिवसांनी RT-PCR चाचणी करण्यात यावी.

३) शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यात यावे.

४) वर्ग खोली तसेच स्टाफरूम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distance) च्या नियमा नुसार असावे.

५) शाळेत दर्शनी भागावर (Physical Distance) मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना posters / stickers लावण्यात यावे. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान ६ फुट इतकी शारीरिक अंतर (Physical Distance) राखले जाईल याकरिता विशिष्ठ चिन्हांकन करण्यात यावे, शारीरिक अंतर (Physical Distance) राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाच्या बाणाच्या खुणा करण्यात याव्यात, याबाबतची व्यवस्था शाळेने करणे आवश्यक राहील.

६) विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करून घ्यावी.

७) शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखण्याकरिता शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करण्यात यावा. स्वच्छतागृहाचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे, याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी खात्री करून घेणे आवश्यक राहील.

८) विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोन वेळा (विद्यार्थी वाहनात बसण्याअगोदर व उतरल्यानंतर) निर्जंतुकीकरण करण्यात यावे. याची खातरजमा शाळा व्यवस्थापनाने करावी.

९) सदर आदेश हे पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे कटक मंडळ व खडकी कटक मंडळ यांना देखील लागू असणार आहेत.

कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी पारित केलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ ते ६०, तसेच भारतीय दंड संहिता, कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com