Jalna News: जालना शहरावर पाणीसंकट; अंबळ शहरास पाणी देण्यास विरोध

जालना शहरावर पाणीसंकट; अंबळ शहरास पाणी देण्यास विरोध
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

जालना : जालना शहरावर लवकरच पाणी टंचाईचं सावट येण्याची भीती जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केली आहे. जायकवाडी- जालना (Jalna News) पाणीपुरवठा योजनेतून ११ एमएलडी पाणी द्या; अशी मागणी (Ambad) अंबड नगरपरिषदेच्या माध्यमातून बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र अंबड शहराला पाणी दिल्यास जालना शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. (Breaking Marathi News)

Jalna News
Ahmednagar Crime News: अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेत अत्याचार

जायकवाडी-जालना ही २० एमएलडी क्षमतेची पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेतून आधीच ४ एमएलडी पाणी अंबड नगरपरिषदेला दिलं जातं. आता आणखी ११ एमएलडी पाणी अंबड शहराला दिल्यास जालना शहरात फक्त ६ ते ७ एमएलडी पाणी येईल. असं झाल्यास शहरातील नागरीकांना पाणी मिळणार नाही. त्यामुळे या योजनेतून अंबड शहराला पाणी दिल्यास स्वातंत्र्यदिनी आंदोलन करण्याचा ईशारा काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिलाय.

Jalna News
Ahmednagar News: शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतले दूध; सरकारच्या निर्णयाचा निषेध

अंबडच्या मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जालना नगरपरिषदेच्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे. सध्या अंबड शहराला जायकवाडी- जालना योजनेतून होतो ४ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. अंबड शहराला ११ एमएलडी पाणी देण्यासाठी अंबडच्या मुख्याधिकाकाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र जालना नगरपरिषदेच्या नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे. मात्र अंबडला पाणी देण्यास काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांचा विरोध आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com