Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन; योग्य मोबदला मिळण्यासाठी आक्रमक

Jalna News : जालना - नांदेड दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम करण्यात येत असून या महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला मिळावा; यासाठी जालन्यातील देवमूर्ती येथे मागील ७५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: समृद्धी महामार्गाचा दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु करण्यात आले असून यात शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. दरम्यान या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा; यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांनी आज ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. 

नागपूर- मुंबई अशा समृद्धी महामार्गाचा दुसऱ्या टप्पातील कामाला सुरवात करण्यात आली आहे. यात जालना - नांदेड दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम करण्यात येत असून या महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला मिळावा; यासाठी जालन्यातील देवमूर्ती येथे मागील ७५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. 

Samruddhi Mahamarg
Pandharpur Crime : पंढरपुर हादरले! माय लेकाची घरात घुसून हत्या; मारेकरी घराला कुलूप लावून पसार

जनावरे, अवजारे घेऊन ठिय्या 

जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी होणाऱ्या जमीन संपादनाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देत शेतकऱ्यांनी जनावरे आणि शेतीची अवजारे घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. देवमूर्ती परिसरात सुरु असलेल्या आंदोलनात अनुचित प्रकार होऊ नये; यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Samruddhi Mahamarg
Ganesh Festival : पुण्यात ढोल- ताशा पथकांना सरावासाठी हवी जागा; भाजपकडून महापालिकेला जागेसाठी निवेदन

प्रशासनाला दिला अल्टिमेटम 

दरम्यान शेतकरी बाजारभावानुसार नुकसान भरपाई द्यावी, मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर फळबागांना भरपाई मिळावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांचे संतप्त सूर उमटत असून त्यांनी प्रशासनाला ठोस निर्णयासाठी अल्टिमेटम दिला आहे. तर आज शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा देत आंदोलनस्थळी ठिय्या मांडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com