Maratha Aarkshan : मराठा समाजाने धुळे- सोलापूर महामार्ग अडवला; जरांगे पाटलांची तब्येत खालावल्याने मराठा समाज आक्रमक

Jalna News : उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून पाटलांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीतून मराठा समाज आक्रमक होत थेट हायवेवरती आलं
Maratha Aarkshan
Maratha AarkshanSaam tv
Published On

जालना : मराठा आरक्षणासाठी समाजाचा लढा सुरु आहे. दरम्यान उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची (Maratha Aarkshan) तब्येत खालावल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून अंतरवालीतून आंदोलक आक्रमक होऊन थेट हायवेवर (Jalna) उतरले आहेत. मराठा समाजाच्या वतीने धुळे- सोलापूर हायवेवर रास्ता रोको आंदोलन केले. (Latest Marathi News)

Maratha Aarkshan
Jalgaon News : महावितरणच्या अधिकाऱ्यांना कुलूप लावून कोंडले कार्यालयात; वीज पुरवठा सुरळीत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक

धुळे- सोलापूर हायवेवर (dhule Solapur Highway) मराठा समाजानं चक्का जाम आंदोलन करत रास्ता रोको केला. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून पाटलांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीतून मराठा समाज आक्रमक होत थेट हायवेवरती आलं आणि रास्ता रोको (Manoj Jarange Patil) केला. वडिगोद्री फाट्यावर मराठा समाजाचा चक्का जाम आंदोलन सुरु आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Aarkshan
Dhule Crime : दिवसाढवळ्या मोटरसायकल चोरी; सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद

महामार्ग जाम 

आरक्षणाची मागणी करत रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्यामुळे यावेळी दोनही बाजूंनी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचं बघायला मिळाले. आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com