Jalna Corporation : पंधरा दिवसात ६० लाखांची कर वसुली; थकित कर धारकांविरोधात जालना महापालिका ॲक्शन मोडवर

Jalna News : सरत्या आर्थिक वर्षात अधिक वसुली करून नवीन वर्षात थकीत कराची रक्कम कमी होईल. त्यानुसारच जालना महापालिका प्रशासनाने देखील मागील महिनाभरापासून वसुली मोहीम राबवत बड्या थकबाकीरावर नजर आहे
Jalna Corporation
Jalna CorporationSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: महापालिका, नगरपालिका अंतर्गत असलेल्या थकीत मालमत्ता कर धारकांविरोधात धडक वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जालना महापालिकेकडून देखील मोहीम सुरु करण्यात आली असून मागील पंधरा दिवसात तब्बल ६० लाख रुपयांचा कर महानगरपालिकेने वसूल केला आहे. तर थकीत शंभर कोटी रुपये कर वसूल करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. 

आर्थिक वर्ष समाप्तीसाठी अडीच महिन्यांचा कालावधी उरला आहे. यामुळे महापालिका व नगरपालिकेकडून मागील काही वर्षात कर थकविणाऱ्या विरोधात वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. अर्थात सरत्या आर्थिक वर्षात अधिक वसुली करून नवीन वर्षात थकीत कराची रक्कम कमी होईल. त्यानुसारच जालना महापालिका प्रशासनाने देखील मागील महिनाभरापासून वसुली मोहीम राबवत बड्या थकबाकीरावर नजर आहे. 

Jalna Corporation
Kolhapur News : वधू- वर नोंदणी संकेतस्थळावरून केली ओळख; लग्नाच्या आमिषने महिलेची फसवणूक; पुण्यातील एकाला घेतले ताब्यात

१५ मालमत्ता धारकांच्या प्रॉपर्टी केल्या जप्त 
जालना शहरातील थकीत मालमत्ता कर धारकांविरोधात जालना शहर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली असून मागील पंधरा दिवसांमध्ये महानगरपालिकेने तब्बल ६० लाख रुपयांचा थकीत कर वसूल केला आहे. तर जवळपास १५ मालमत्ता धारकांच्या प्रॉपर्टी महानगरपालिकेने जप्त केल्या आहेत. आगामी पुढील दिवसात वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

Jalna Corporation
Dhule Crime : मित्राच्या मदतीने पुतण्याने काकाला संपविले; कोंडाईबारी घाटातील 'त्या' मृतदेहाबाबत धक्कादायक माहिती आली समोर

१०० कोटी वसुलीचे लक्ष 

महिनाभरापासून हि मोहीम राबविली जात असून दरम्यान महानगरपालिकेची कर वसुलीची ही मोहीम सुरू राहणार आहे. या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने एकूण शंभर कोटी रुपये कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवल असल्याचं जालना शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी म्हटले आहे. त्यानुसार हि कारवाई सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com