Jalna News: शेतीच्या वादाकडे पोलिसांचे दुर्लक्ष; शेतकऱ्याचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

Jalna News : शेतीच्या वादाकडे पोलिसांचे दुर्लक्ष; शेतकऱ्याचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

जालना : भावजाई आणि पुतण्यासोबत सुरु असलेल्या शेतीच्या वादाची कुठलीच दखल पोलिस घेत नाही. यामुळे संतप्त शेकऱ्यांनी (Farmer) केदारखेडा गावातील मोबाईल टावरवर चढून शोले स्टाईल (Jalna News) आंदोलनाला सुरुवात केली आहे. अगदी सकाळपासून ते टॉवरवर चढले आहेत. (Breaking Marathi News)

Jalna News
KDMC News: अन्यथा तुमच्या तोंडाला काळे फासू; शिवसेना पदाधिकाऱ्यांचा केडीएमसी अधिकाऱ्यांना दम

जालना जिल्ह्यातील जवखेडा ठोंबरे गावातील शेतकरी पंडित महादुसिंग बिलगे असं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा जवखेडा ठोबरे शिवारात असलेल्या भाऊ हिशाचा जमिनीचा वाद सुरु आहे. या वादातून पुतण्या आणि भावजाई तलवार घेऊन आपल्याला वारंवार मारहाण करत असल्याबाबत तक्रार दिली आहे. याची दखल भोकरदन पोलिस (Police) दखल घेत नसल्याने त्या विरुद्ध या शेतकऱ्यांनी आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून आंदोलनाला सुरवात केली. 

Jalna News
Chandrashekhar Bawankule: कोरोना काळात तर मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं; चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

शेतकरी टॉवरवर चढल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी टॉवरजवळ धाव घेऊन शेतकऱ्याला खाली उतरण्याची विनवणी केली. मात्र जोपर्यंत संबंधित विरोधात कारवाई होत नाही. तोपर्यंत खाली उतरणार नाही; अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम असल्याने पोलिसांच्या चिंतेत भर पडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com