Maratha Reservation: आरक्षणासाठी समाज आक्रमक; सर्व पक्षाच्या शाखेचे बोर्ड पुसण्यास सुरवात

Jalna News : आरक्षणासाठी समाज आक्रमक; सर्व पक्षाच्या शाखेचे बोर्ड पुसण्यास सुरवात
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv
Published On

जालना : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. आज मनोज जरांगे पाटील आपली भूमिका (Jalna News) मांडणार आहे. मात्र त्या अगोदरच बदनापूर तालुक्यातील अनेक गावांनी गावागावत नेते मंडळींना बंदी घालण्यास सुरवात केली. यात गावात लावण्यात (Maratha Aarkshan) आलेल्या पक्षाच्या शाखा बोर्डांवर रंग लावून पुसण्यास सुरवात करण्यात आली आहे. (Maharashtra News)

Maratha Reservation
Nanded News : आरक्षणासाठी युवकाने संपविले जीवन; तामसा शहरात टायर जाळून कडकडीत बंद

ग्रामीण भागातील आक्रमक मराठा समाजामुळे जिल्ह्यातील नेते मंडळीना ही गावागावातील पक्षीय कार्यक्रम रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश टोपे, नायराण कुचे, संतोष दानवे हे सर्व नेते मंडळी आपल्या मतदार संघात असतानाही त्यांनी त्या सार्वजनिक कार्यक्रमास जाण आता टाळायला सुरवात केली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे दोन दिवसापासून जिल्ह्यात असताना सुद्धा त्यांनी आज जालना जिल्ह्यातील नियोजित गावांचा दौरा रद्द करुन ते बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना भेटीस गेल्याची माहिती ही अधिकृत सूत्रांनी दिलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Kalyan News : पैसे देऊनही घर मिळेना; बिल्डरच्या कार्यलयात कुटुंबाचा रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न

अनेक नेते मंडळींनी जिल्ह्यातील विविध कार्यक्रमाकडे पाठ फिरवायला सुरवात केली. काही नेते मराठा आंदोलकच्या कॉलमुळे नॉटरिचेबल होताना दिसत आहे. बदानापूर तालुक्यातील धोपटेंश्वर, गेवराई, खदगाव या गावातील मराठा समाजाच्यावतीने नेते मंडळीवर बहिष्कार घालण्यात आला आहे. तर गावातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या शाखेच्या बोर्डला पांढरा रंग लावण्यात आला असून त्यावर एक मराठा लाख मराठा असं लिहण्यात आलं आहे. जोपर्यंत सरकार मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण देत नाही, तो प्रयन्त कुठलाच समाजाचा व्यक्ती पक्षाचे काम करणार नसल्याची भूमिका या ग्रामस्थांनी घेतली. २४ तारखेच्या आत आरक्षण द्या; अन्यथा होणाऱ्या परिणामला सामोरे जा असा इशाराही या ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com