जालना : मी स्वत: त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. तेव्हा अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांकडे सत्ता स्थापनेची विनंती करण्यासाठी गेलो होतो; अशी प्रतिक्रीया कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे. (Jalna News Abdul Sattar)
एकनाथ शिंदे हे युपीच्या काळात आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी आले होते; असा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) केला होता. या विधानावर कृषी मंत्री सत्तार यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. जालन्यात (Jalna) हिंदूगर्वगर्जना मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते.
ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेचे नेतृत्व मानावे आणि जुळवून घ्यावे. जुळवून घेतले नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल असे सत्तार यांनी म्हटल़े आहे. त्याच बरोबर चंद्रकांतं खैरे यांना गणिताची टोटलच कळत नाही. असं म्हणत सत्तार यांनी खैरेंवर टीका केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.