Jalna News : जालन्यातील रस्त्यावर १० फुटाचे खड्डे; रस्त्याची अक्षरशः झालीय चाळणी

Jalna News : जालना शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. प्रामुख्याने रेल्वे स्टेशन ते मुक्तेश्वरद्वार या दरम्यानच्या रस्त्याची अधिक बिकट अवस्था झालेली आहे.
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: जालना शहरातील रेल्वे स्टेशन ते मुक्तेश्वरद्वार या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर ८ ते १० फुटांचे मोठे खड्डे पडले असल्याने रस्त्यावरून वाहन तर सोडाच नागरिकांना पायी चालणे देखील अगदी कठीण झाले आहे. दरम्यान पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. 

Jalna News
Parola News : पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचा मृत्यू; पारोळा जवळील भोकरबारी धरणातील घटना

जालना (Jalna) शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. प्रामुख्याने रेल्वे स्टेशन ते मुक्तेश्वरद्वार या दरम्यानच्या रस्त्याची अधिक बिकट अवस्था झालेली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर अगदी ८ ते १० फूट इतके मोठे आहेत, यामुळे या खड्ड्यांमधून वाहन चालविणे देखील कठीण जात असते. विशेष म्हणजे महानगरपालिका आयुक्तांची कार याच रस्त्याने जात असतानाचा व्हिडिओ समोर आला. 

Jalna News
Akola Accident : अकोल्याजवळ भीषण अपघात; सातजण गंभीर जखमी

ऐन पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साचत असल्याने परिसरात साथीचे आजारही उद्भवण्याचा धोका निर्माण झाला. अगोदरच साथीचे आजार पसरले असून डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या आजारांनी डोके वर काढले काढले असताना देखील महापालिका प्रशासन अद्याप या कडे लक्ष देत नाही. दरम्यान परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com