Manoj Jarange Patil Protest: उपोषणाचा १४ वा दिवस... औषध, पाण्याचा त्याग केल्यानंतर उपचारासही नकार; कशी आहे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती?

Manoj Jarang Patil Protest: पाणी आणि औषध- उपचार घेण्यास नकार दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणीसही नकार दिला आहे.
Maratha Reservation Latest Update Manoj Jarange Patil Serious Allegations Against Shinde Fadnavis government
Maratha Reservation Latest Update Manoj Jarange Patil Serious Allegations Against Shinde Fadnavis governmentSaam TV

Maratha Reservation News: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. काल सकाळपासून त्यांनी पाणी आणि औषध उपचार घेण्यास ही नकार दिला होता. आज त्यांनी उपचारासही विरोध केल्याने चिंता वाढली आहे.

Maratha Reservation Latest Update Manoj Jarange Patil Serious Allegations Against Shinde Fadnavis government
Buldhana Crime: पत्नीसोबत संबंध असल्याचा संशय, २५ वर्षीय तरुणाची भरदिवसा निर्घुण हत्या; परिसरात खळबळ

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या 14 दिवसापासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. सरकारकडून मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र मिळावे म्हणून वंशावळीच्या आधारे आधादेश ही काढण्यात आला. मात्र यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला चार दिवसाचा अल्टीमेटम दिला होता.

हा चार दिवसाचा अल्टीमेटम संपल्यानंतर जरागे यांनी काल सकाळपासून पाणी आणि औषध उपचार घेण्यासही नकार दिला आहे. आज जिल्हाआरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने सकाळी त्यांची तपासणी करण्यासाठी आंदोलन स्थळ गाठून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास जरांगे पाटील यांनी नकार दिला असून सुधारित अध्यादेश आणल्यास मी उपचार घेतो असे डॉक्टरांना सांगितले आहे.

Maratha Reservation Latest Update Manoj Jarange Patil Serious Allegations Against Shinde Fadnavis government
Jayakwadi Water Level: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ; मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटणार?

काय म्हणाले डॉक्टर?

"उपचारासही नकार दिल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती आता गंभीर होत चालली असल्याने चिंता वाढली आहे. कालपासून पाणी न पिल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, ब्लड शुगरची पातळी कमी होण्याचे धोके आहेत, मात्र तपासणी केल्याशिवाय माहिती देता येणार नाही," असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मराठा आंदोलनात छावा संघटनेची उडी...

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छावा संघटनाही आक्रमक झाली आहे. मराठा आरक्षणाची लढाई आरपारची आणि शेवटची आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना वेळ पडली तर हातात दंडुके घेऊन रस्त्यावर उतरेल अशी भूमिका संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी मांडली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com