Buldhana Crime: पत्नीसोबत संबंध असल्याचा संशय, २५ वर्षीय तरुणाची भरदिवसा निर्घुण हत्या; परिसरात खळबळ

Sangrampur News: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात २५ वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
Buldhana crime news
Buldhana crime newssaam tv

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात २५ वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून ही भयंकर घटना घडली असून या प्रकरणी आरोपी त्रिशरण रामदास इंगळे यास पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.

Buldhana crime news
Jayakwadi Water Level: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ; मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटणार?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या गावातील आकाश सुरेश परघरमोर या २५ वर्षीय युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत तरुण व आरोपीच्या पत्नीचे प्रेमप्रकरण असल्याचा संशयातून दिवसाढवळ्या हे हत्याकांड घडले आहे.

आरोपी त्रिशरण इंगळे याची पहिली पत्नी मुले येथे सोडून काही वर्षापूर्वी पळून गेली. दुसऱ्या पत्नीसोबतही त्याचे वारंवार चारित्र्यावर संशय घेऊन खटके उडत होते. ९ सप्टेंबर रोजी पत्नीला त्रिशरणने मारहाण केली. त्यामुळे ती मुलीसह माहेरी निघुन गेली होती. मृत आकाश व पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय त्रिशरनला होता.

Buldhana crime news
Aditya l-1 Mission: आदित्य एल-1ची सूर्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल; आता नेमकं कुठं पाहोचलं? जाणून घ्या नवीन अपडेट

याच संशयाने पछाडल्याने १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता घराजवळ आकाश यास त्रिशरण याने चाकूने सपासप वार करून निर्दयीपणे भोसकले. या हल्ल्यात आकाशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी गाडी सोडून पळून गेला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com