Maratha Andolan: जालन्यातील हिंसाचार प्रकरणात ३०० हून जणांवर गुन्हे; पोलिसांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप

Jalna Maratha Andolan Latest Updates: जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी तुफान लाठीमार केला. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले.
Jalna Maratha reservation Protest 300 unknown people cases filed in violence case
Jalna Maratha reservation Protest 300 unknown people cases filed in violence caseSaam TV
Published On

Jalna Maratha Andolan Latest Updates: जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी तुफान लाठीमार केला. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले. त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. राज्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून वाहनांची तोडफोड केली. तसेच काही ठिकाणी बसेसही जाळण्यात आल्या. (Latest Marathi News)

Jalna Maratha reservation Protest 300 unknown people cases filed in violence case
Raj Thackeray News: इथे सरकारचं चुकलं, जालन्यातील घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; सरकारवर हल्लाबोल

आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत एका पोलीस (Police) अधिकाऱ्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील गंभीर दुखापती झाल्या आहेत. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जालन्यात जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३०० ते ३५० अज्ञात लोकांवरतीही गुन्हे दाखल केले आहे. तर काही ठिकाणी आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं आहे. जालन्यातील (Jalna News) गोंदी पोलीस स्थानकात कलम ३०७ आणि ३३३ अंतर्गत या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

Jalna Maratha reservation Protest 300 unknown people cases filed in violence case
Maratha Aarakshan Andolan Live News : संभाजीराजेंनी घेतली मराठा आंदाेलकांची भेट, घटना सांगताना महिला ढसाढसा रडल्या

सार्वजनिक मालमत्तेलचे नुकसान करणे, जाळपोळ तसेच दगडफेक करणे, अशा गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, हे गुन्हे दाखल केलेल्या अज्ञात व्यक्तींची संख्या आणखीच वाढू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, जालन्यात झालेल्या या घटनेनंतर माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी जालन्यातील मराठा आंदोलनकाची भेट घेतली.

यावेळी त्यांनी लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केला. आंदोलकांवर तुम्ही गोळीबार कसाकाय करु शकता. मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर ती आधी छत्रपती संभाजीराजेवर घाला अशी उदिग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. लाठीचार्ज झाला, गोळ्या झाडल्या, अश्रू धुरकांड्या फोडल्या. कालचा प्रकार निंदनीय आहे. आम्ही सरकारचा निषेध करतो, असं राजे म्हणाले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com