जळगाव: विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असताना महायुतीमध्ये मात्र अंतर्गत राजकारण रंगू लागले आहे. जळगावमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचा वाद उफाळून आला आहे. पाचोरा येथे आयोजित शिंदे सेनेच्या निर्धार मेळाव्याला भाजप पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देवूनही दांडी मारल्याने गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीपूर्वीच पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजप शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. पाचोरा येथे आयोजित शिंदे सेनेच्या निर्धार मेळाव्याला आव्हान करूनही भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते हजर राहिले नाहीत. यावरुनच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले आहे.
वरिष्ठांकडे आजच्या मेळाव्यात जे घडलं या गोष्टी मी मांडणार आहे. युतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये याचा परिणाम हा संपूर्ण महाराष्ट्रावर होईल. उद्याच्या दिवशी मुंबईला कॅबिनेट मिटींग आहे. त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर हा प्रकार आम्ही मांडणार आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत आपण एक संघ होतो म्हणून विपरीत वातावरण असताना सुद्धा दोन्ही सीट आपल्या निवडून आल्या. त्याचप्रमाणे जर आपण विधानसभेत एक संघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यातील 11 ते 11 जागा निवडून येऊ शकतात. मात्र आपल्यात फूट असणं हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, आता गुलाबराव पाटील यांच्या तक्रारीनंतर महायुतीचे नेते काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.