लंपी संसर्गाची माहिती लपविल्यास पशू डॉक्टरांच जबाबदार

लंपी संसर्गाची माहिती लपविल्यास पशू डॉक्टरांच जबाबदार
Lumpy Virus
Lumpy VirusSaam tv
Published On

जळगाव : जिल्ह्यात लंपी या आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. आत्तापर्यंत ५६५ जनावरांना या आजाराची लागण (Lampi Virus) झाली असली तरी ३६३ जनावरे या आजारातून बरी झाली आहेत. १७९ जनावरांवर उपचार सुरू आहे, तर २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लंपी या आजाराची लागण जनावराला झाल्यास आणि प्रशासनाला माहिती न देता त्यावर खासगी वैद्यकीय व्यावसायिकाने उपचार केल्यास त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Jalgaon News Lumpy Virus)

Lumpy Virus
Jalgaon: सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी; तीन ठिकाणी ढगफुटी

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील या वेळी उपस्थित होते. जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लंपी या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले, की (Jalgaon) जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण ३३ ठिकाणे लंपी आजाराने बाधित असून, त्यामध्ये एकूण पशुधनसंख्या एक लाख २५ हजार ९८८ इतकी आहे. त्यापैकी एक लाख ११ हजार ८०२ गुरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये दोन लाख दोन हजार लससाठा शिल्लक आहे.

जनावरांचे बाजार बंद

जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार बंद करण्यात आलेले आहेत. जिल्ह्याच्या लगत असलेली मध्य प्रदेश राज्याची सीमा त्यातून होत असलेली जनावरांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. सार्वजनिक चराई कुरण पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत आहे. एकत्र पाणी पिण्याची हौद पुढील १५ दिवसांसाठी बंद करण्यात आलेले आहेत. गोठा स्वच्छता व गोचिड निर्मूलन मोहीम ग्रामपंचायतीच्या मदतीने व पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने करण्यात यावी. या आजाराने मृत झालेल्या जनावरांचे शास्त्रोक्त पद्धतीने उपचार करण्यात यावे, तरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर त्‍या डॉक्‍टरांवर कायदेशीर कारवाई

खासगी डॉक्टरांनी व पशुपालकांना लंपी रोगसदृश लक्षणे दिसताच १९६२ या नंबरवर तत्काळ कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. बाधित जनावरांचे उपचार हे पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्फत किंवा मार्गदर्शनाखाली करण्यात यावे. खासगी डॉक्टरांनी परस्पर उपचार केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com