मायेचा पांझर..काटेरी झुडपात पडलेल्‍या वेडसर महिलेला आधार

मायेचा पांझर..काटेरी झुडपात पडलेल्‍या वेडसर महिलेला आधार
मायेचा पांझर..काटेरी झुडपात पडलेल्‍या वेडसर महिलेला आधार

वरणगाव (जळगाव) : वरणगावकरांच्या हृदयाला फुटला मायेचा पांझर फुटल्‍याचे चित्र आशादायक दृश्‍यातून पाहण्यास मिळाले. भुसावळकडे जाताना जुन्या महामार्गाच्या कडेला एका काटेरी झुडपात निर्वस्त्र वेडसर ३२ ते ३५ वयोगटातील महिला आढळली. नागरीकांनी त्या महिलेला बाहेर काढून कपडे घातले आणि मायेची साद दिली. (Jalgaon-news-varangaon-positive-story-highway-Support-for-a-cracked-woman)

येथील जूना महामार्गालगत सकाळी दहाच्या सुमारास ३२ ते ३५ वयोगटातील एक वेळसर महिला महामार्गाच्या बाजूला काटेरी झुडपांत निर्वस्र परीस्थीतीत नागरीकाच्या नजरेस पडली. नागरीकांनी सदर बाब सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांच्या लक्षात आणून दिली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा तावडे यांना देखील माहिती मिळाली. त्यांनी त्या वेडसर महिलेला घटनास्थळीच कपडे घालून वरणगाव पोलीस स्टेशनला आणले. महिलेच्या बाबतीत प्रतिभा तावडे यांनी प्राथमिक विचारपूस करून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती महिला बोलण्याच्या मानसिकतेत नसल्याने तिच्या संबंधित अशी ठळक कोणतीही माहिती मिळू शकली नाही. तर सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांनी महिलेस जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देत आनंद महिला फाउंडेशनच्या सदस्य लक्ष्मीबाई बैरागी व महिला पोलीस कर्मचारी श्रीमती भोई यांच्यासोबत जळगाव येथे रवाना केले.

मायेचा पांझर..काटेरी झुडपात पडलेल्‍या वेडसर महिलेला आधार
नारायण राणेंच्‍या अटकेनंतर शिवसैनिकांचा जल्‍लोष; जळगावात फोडले फटाके

आशादीप फाउंडेशमध्‍ये केले रवाना

महिलेला बोलता, वाचता, येत नाही. कोण काय बोलतय काहीच समजत नाही. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकत्‍र्यासह शासकिय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत सदर महिलेला जळगाव येथील आशा दिप फांऊडेशन या स्वयंमसेवी संस्थेकडे रवाना केले. याकरीता वरणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कुमार बोरसे, जळगाव येथील महिला व बालकल्याण विभाग जिल्हा अधीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या महिलेला संस्थेकडे रवाना केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com