नारायण राणेंच्‍या अटकेनंतर शिवसैनिकांचा जल्‍लोष; जळगावात फोडले फटाके

नारायण राणेंच्‍या अटकेनंतर शिवसैनिकांचा जल्‍लोष; जळगावात फोडले फटाके
नारायण राणेंच्‍या अटकेनंतर शिवसैनिकांचा जल्‍लोष; जळगावात फोडले फटाके

जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राज्‍यभरात शिवसैनिकाकांकडून घोषणा देत आंदोलन करत अटकेची मागणी करण्यात येत होती. मात्र दुपारी राणे यांना पोलिसांनी अटक केल्‍यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्‍लोष केला. (Jalgaon-news-narayan-rane-arrest-police-and-shiv-sena-jallosh)

राज्‍यभरात शिवसैनिकांकडून सकाळपासून सुरु असलेल्या संघर्षानंतर केंद्रिय मंत्री नारायण राणेंना पोलीसांनी अटक केली आहे. रत्नागिरीच्या संगमेश्वर येथील गोळवलीकर गावात त्यांना अटक करण्यात आली. रत्नागिरी सत्र न्यायालयाने राणेंचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर राणेंना संगमेश्वर याठिकाणी त्यांना अटक करण्यात आली.

शिवसैनिकांचा जल्‍लोष

राज्यभरात शिवसैनिकांमध्‍ये संतापाची लाट उसळली होती. राणेंच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, धुळे या शहरात शिवसेना विरुद्ध भाजपा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र दिवसभराच्या संघर्षानंतर अखेर त्यांना करण्यात आली. यानंतर शिवसैनिकांनी जल्‍लोष केला. जळगावात महापालिकेसमोर शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्‍लोष केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com