धानोरा (जळगाव) : खर्डी (ता. चोपडा) येथून तिन बैलांची चोरी करून रात्रीच पसार होण्याच्या बेताने असणाऱ्या चोरांच्या योजनेवर बिडगावजवळ विजवितरच्या तुटलेल्या तारांमुळे पाणी फेरले गेले. यात शेतकऱ्यांच्या (Farmer) दोन बैलांचा दुदैवी मृत्यू झाला. तर एक बैल या घटनेतून बचावला असून बैल चोरणारे आरोपी मात्र पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. (Jalgaon News Electric Shock)
खर्डी (ता.चोपडा) येथील येथील मोहन ओंकार पाटील व अनिल दामू चांभार या शेतकऱ्यांचे ग्रामपंचायत (Gram Panchayat) जवळ गोठे आहेत. तेथे नेहमीप्रमाणे बैलं बांधलेले होते. १८ जुलैला मध्यरात्री चोरट्यांनी या गोठ्यांमधून (Jalgaon News) मोहन पाटील यांचा एक बैल व अनिल चांभार यांची बैलांची जोडी असे तीन बैल चोरून रात्रीच शेतशिवारातून ६ कि.मी. पायदळ आले.
बिडगाव शिवारात बैलांचा मृत्यू
बिडगावजवळ अरविंद निळकंठ पाटील यांच्या शेतात विजपुरवठा करणारा तार तुटून पडला होता. त्यात विजपुरवठा असल्याने शॉक लागून दोन बैल मृत झाले. सदर घटना मंगळवारी (ता.१९)सकाळी लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी धाव घेत बैलांची ओळख पटवली. ते खर्डी येथील असल्याचे त्यांना माहीती दिली असता बैल मालकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तिसऱ्या बैलाचा शोध घेतला असता तो जवळच शेतात आढळून आला. चोर मात्र पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.मात्र शेतकरीचे ऐन हंगामात बैल जोडी मृत होऊन जवळपास ८० हजार रुपयांचे नूकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.