ऑनलाइन व्‍यवसायाचे आमिष; महिलेची तीन लाखात फसवणूक

ऑनलाइन व्‍यवसायाचे आमिष; महिलेची तीन लाखात फसवणूक
Online Fraud
Online FraudSaam tv

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागात वास्‍तव्‍यास असलेल्‍या महिलेला ऑनलाईन व्यवसायाचे आमिष दाखवून ३ लाखांत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात (Police) चारही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news The lure of online business Woman cheated for Rs three lakh)

Online Fraud
जोरदार वाऱ्याने उडाले घराचे छप्पर; घरातील आई व बाळाला दुखापत

जळगावातील (Jalgaon) शिवाजीनगर भागातील खडकेचाळ भागात वैशाली रमेश बाविस्कर या वास्तव्यास आहेत. १ ते ३० मे या काळात त्यांना राहूल अग्रवाल, तुषार इंगळे, महेश शिंपी व पल्लवी शिंपी या चार जणांनी ऑनलाईन व्यवसाय करण्याचे सांगत त्यातून जास्तीचा फायदा होईल असे आमिष दाखविले. या ऑनलाईन (Online Fraud) व्यवसायासाठी कर्ज काढण्यास भाग पाडून फिर्यादीचे स्टेट बँकेच्या खात्यावरुन रक्कम एचडीएफसी बँकेच्या (Bank) खात्यावर वर्ग करण्यास सांगितले. त्यानंतर (Cyber Crime) ऑनलाईन मिटींग घेवून वैशाली बाविस्कर यांच्याकडून ओटीपी क्रमांक मिळवला. या क्रमांकाच्या आधारावर वैशाली बाविस्कर यांच्या खात्यातून २ लाख ६१ हजार व २७ हजार ६०८ व ११ हजार ६६४ असे एकूण ३ लाख २८१ रुपये परस्पर काढून घेतले.

विचारणा केल्‍यावर मारहाण

फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर वैशाली बाविस्कर या संबंधितांकडे याबाबत विचारणा करण्यास गेली असता, महेश शिंपी व पल्लवी शिंपी या दाम्पत्याने वैशाली बाविस्कर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. महिनाभर झालेल्या या प्रकाराबाबत वैशाली बाविस्कर यांनी बुधवार (१ जून) शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन राहूल अग्रवाल, तुषार इंगळे, महेश शिंपी व पल्लवी महेश शिंपी या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र प्रभाकर सोनार हे करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com