जळगाव : सुरेशदादा जैन यांनी राजकारणात राहून वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. परंतु, आता त्यांनी राजकारणात यावे की नाही हा त्यांचा व्यक्तीगत विषय आहे. परंतु, माझ्या मतानुसार जैन यांनी राजकारणात येवून पुन्हा मैदानात उतरावे; अशी प्रतिक्रीया (Gulabrao Patil) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. (Letest Marathi News)
घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना न्यायालयाने अंतिरित नियमित जामीन मिळाला. यानंतर बुधवारी रात्री त्यांचे जळगावात (Jalgaon) आगमन झाले. आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
बोट पकडून राजकारणात आलो
सुरेशदादा यांचे मार्गदर्शनाने आणि त्यांचे बोट पकडून आम्ही राजकरणात आलो आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर त्यांचे जळगाव शहरात आगमन झाले आहे. राजकरणानंतर त्यांनी आता कुटुंबियांकडे लक्ष देणार आहे. असे असतांना त्यांनी आमच्याकडेही लक्ष द्यावं, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.