Dasara Melava: मेळाव्यासाठी जाणाऱ्यांना ४०० रुपये रोजंदारी; पाचोऱ्यात बहिणीचा आमदार पाटलांना टोला

मेळाव्यासाठी जाणाऱ्यांना ४०० रुपये रोजंदारी; पाचोऱ्यात बहिणीचा आमदार पाटलांना टोला
Jalgaon News Pachora Shiv Sena
Jalgaon News Pachora Shiv SenaSaam tv
Published On

जळगाव : शिंदे गटाच्या मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे पाचोरा (Pachora) तालुक्यातील तब्बल दोनशे बसेस रवाना करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे या बसेस रवाना होत असताना आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांच्या भगिनी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी भव्य असे योग शिबिर घेऊन त्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल्याच पहायला मिळाले. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर बसेस तसेच वाहनांमधून कार्यकर्त्यांना मुंबईच्या (Mumbai) मेळाव्यासाठी नेले जात आहे. तब्बल ४०० रुपये रोजंदारी ही मेळाव्यासाठी जाणाऱ्या नागरिकांला दिली जात असल्याची शोकांतिका असून असे दसरा मेळाव्याला यापूर्वी कधी घडले नव्हते; अशी टीका शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांना लगावला आहे. (Jalgaon Pachora Shiv Sena News)

Jalgaon News Pachora Shiv Sena
Gold Price Today: सोने पाचशे तर चांदीत तीन हजारांची वाढ

शिवसेनेत फूट पडल्यामुळे यंदा मुंबईत उद्धव ठाकरे गटाचा तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचा असे दोन स्वतंत्र दसरा मेळावे (Dasara Melava) होत आहेत. दसरा मेळाव्यासाठी पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात असताना दुसरीकडे त्यांच्या भगिनी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे वडील कट्टर शिवसैनिक स्व. आर.ओ. पाटील यांचे जे शिवसैनिक सुदृढ व्हावेत, निरोगी राहावेत अस जे स्वप्न होते त्यानुसार योग शिबिराचे आयोजन केल्याचे पाहायला मिळाले.

आमदार पाटलांना लगावला खोचक टोला

कार्यकर्त्यांना घेवून जाण्यासाठी गाड्यांची आवश्यकता नाही. कार्यकर्त्यांच्या मनात आतून भावना असल्या पाहिजे असा खोचक टोलाही ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे बंधू शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना लगावला आहे. दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते मुंबईत जाऊ शकले नाहीत. त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे वडील कट्टर शिवसैनिक स्व. आर. ओ. पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून पाचोरा शहरात भव्य अशा योग शिबिराच आयोजन केल्याचे पाहायला मिळाले. पाच दिवसीय योग शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

चारशे रूपये रोजंदारीने मुंबईला पाठविले

जे निष्ठावान शिवसैनिक आहे. त्यांना मुंबईच्या दसरा मेळाव्यासाठी गाडी घोडीची कुठलीही आवश्यकता नाही; असे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे मुंबईच्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर बसेस तसेच वाहनांमधून कार्यकर्त्यांना मुंबईच्या मेळाव्यासाठी नेले जात आहे. तब्बल ४०० रुपये रोजंदारी ही मेळाव्यासाठी जाणाऱ्या नागरिकांला दिली जात असल्याची शोकांतिका असून असे दसरा मेळाव्याला यापूर्वी कधी घडले नव्हते; अशी टीका उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी शिंदे गटात सहभागी झालेल्या त्यांचे बंधू आमदार किशोर पाटील यांच्यासह इतर आमदारांवर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com