Electric Shock: केळी लागवडीसाठी चारी पडताना लागला शॉक; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Jalgaon News : केळी लागवडीसाठी चारी पडताना लागला शॉक; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Electric Shock
Electric ShockSaam tv
Published On

जळगाव : कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या घुसर्डी (ता.पाचोरा) येथे केळी लागवडीसाठी (Farmer) पावटी पाडत असतांना विजेचा धक्का (Electric Shock) बसला. यामुळे तेवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज (८ ऑक्टोम्बर) दुपारी घडली. (Live Marathi News)

Electric Shock
Bus Accident: बसचा भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली

पाचोरा तालुक्यातील घुसर्डी येथील तरुण शेतकरी विकास धर्मा निकुंभ (वय २३) हे काका राजेंद्र निकुंभ आणि चुलत भाऊ साई व यश निकुंभ यांच्यासमवेत शेतात केळी लागवडीसाठी पावटी पाडण्याचे काम करत होते. या दरम्यान पावट्या सरळ पडाव्या यासाठी तारेने ते आखणी करत होते. पावटी पाडण्यासाठी असलेला तार (Jalgaon News) वापरण्यात आला, तो तुटल्यामुळे सदर तार शेतातून गेलेल्या ११ केव्ही या गावठाणच्या लाईनवर गेला. यामुळे त्यात विद्युत करंट उतरल्याने विकास निकुंभ यास विजेचा जोरदार धक्का बसला.

Electric Shock
Manoj Jarange Patil News: सरकारला सद्बुद्धी द्या; मनोज जरांगे पाटील यांचे साईबाबांना साकडं

विजेचा धक्का बसल्याने विकास शेताच्या बांधावर जाऊन बेशुद्ध पडले. सदर प्रकार काका व चुलतभाऊना लक्षात येताच त्यांनी विकासला तात्काळ कजगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले. सदर घटना गावात कळताच रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. विकासच्या पश्च्यात आई- वडील, दोन भाऊ असा परीवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com