गौण खनिज अपहार..आठवडा उलटला अद्याप एक देखील गुन्‍हा नाही दाखल

गौण खनिज अपहार..आठवडा उलटला अद्याप एक देखील गुन्‍हा नाही दाखल
jalgaon zp
jalgaon zp
Published On

जळगाव : जिल्हा परिषद मालकीच्या पाझर तलावातून अवैध गौण खनिज प्रकरणी १४ कंत्राटदार व लघुसिंचन विभागाशी संबंधित उपविभागातील अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी दिले होते. या आदेशाला आठवडा झाला असताना एकावरही गुन्हा दाखल झालेला नाही. अर्थात सीईओंच्या आदेशाला जि. प. अधिकाऱ्यांकडूनच ठेंगा दाखविला जात आहे. (jalgaon-news-Secondary-mineral-embezzlement-week-reversed-yet-not-a-single-case-filed)

jalgaon zp
सात वर्षात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढ

जिल्‍ह्यातील जळगाव, एरंडोल, भडगाव, पाचोरा या चार तालुक्यातील लघुसिंचन विभागाशी संबंधित विविध साठवण बंधारे, सिमेंट नाला बंधारे, कोल्हापूर पद्धतीने दुरुस्ती अशी विविध ३६ कामांमधील रॉयल्टीची रक्कम न भरता त्याच्या बनावट पावती दाखवून लाखो रुपयांची हेराफेरी करण्यात आली आहे. यात ६३ लाख ५० हजार ४११ रूपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १५ नोव्हेंबरला सदर प्रकरणातील कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून रक्कम व्याजासह वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समजते.

पैसे भरा त्‍याचे नंतर पाहू...

गौण खनिज प्रकरणातील दोषी ठेकेदारांसह अभियंत्यांनी सीईओ डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन व्याजासह अपहाराची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, गुन्हे दाखल करू नका अशी विनंती करीत आहे. परंतु, अगोदर पैसे भरा; गुन्‍हे दाखलचे नंतर पाहू अशी भूमिका सीईओंनी घेतल्याची चर्चा आहे. तसेच काहींनी जि. प. पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनाही कारवाई होऊ नये म्हणून हात जोडत असल्याची चर्चा होत आहे.

चार तालुक्यात अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक प्रकरणी ठेकेदारांसह अभियंत्यांनी शासनाची लाखो रुपयांत फसवणूक केली आहे. या प्रकरणी सीईओंनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत गुन्हे दाखल होऊन दोषींकडून व्याजासह रक्कम वसूल होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सुरुच असेल.

– पल्लवी सावकारे, सदस्या, जिल्हा परिषद जळगाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com