जळगावात संचारबंदी; कारवाईसाठी फिरणार पाच पथक

जळगावात संचारबंदीवर निर्बंध; कारवाईसाठी फिरणार पाच पथक
night curfew in jalgaon
night curfew in jalgaon
Published On

जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्‍य शासनाने हळूहळू पुन्‍हा निर्बंध लावण्यास सुरवात केली आहे. रात्रीची संचारबंदीचे आदेश राज्‍य शासनाने काढल्‍यानंतर जळगावात देखील तसे आदेश काढण्यात आले असून, शंभरपेक्षा जास्‍त गर्दी असलेल्‍या ठिकाणी कारवाईसाठी महापालिकेकडून पाच पथक तयार करण्यात येणार आहेत. (Restrictions on curfew in Jalgaon Five squads will move for action)

night curfew in jalgaon
सुसाइड नोट लिहून व्‍हायरल करत संपविली जीवनयात्रा

राज्यात ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या संख्येमुळे कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून जाहीर, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नवे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी याबाबतचे आदेश शनिवारी रात्री काढले आहेत.

लग्‍नाच्‍या बंदिस्‍‍त हॉलमध्‍ये केवळ शंभरची परवानगी

जिल्‍हाधिकारी यांनी काढलेल्‍या आदेशानुसार रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत पाचपेक्षा अधिक जण एकत्र येण्यास बंदी आहे. तसेच बंदिस्त जागेत विवाह (Marriage) सोहळ्यासाठी १०० जण तर मोकळ्या जागेतील सोहळ्यात २५० अथवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीच बंधनकारक आहे. अन्य सामाजिक, राजकीय कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत १०० जण तर मोकळ्या जागेत क्षमतेच्या २५ टक्के उपस्थिती. क्रीडा स्पर्धा, कार्यक्रमांसाठी क्षमतेच्या २५ टक्के उपस्थिती. कीर्तन, रथोत्सव, पालखी, कुस्ती, दंगल, यात्रा- जत्रा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्‍यक आहे. तर रेस्टॉरंट, जीम, स्पा सेंटर, सिनेमा हॉल याठिकाणी आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती आहे. मुख्‍य म्‍हणजे अशा सर्व ठिकाणी उपस्थित राहणाऱ्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्यात, सोबत प्रमाणपत्र आवश्‍यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com