जळगाव : जामनेर तालूक्यातील अल्पवयीन पिडीतेवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या संशयीताने पुनश्च अत्याचाराचा पाढा कायम ठेवल्याची गंभीर घटना घडली. ज्या पिडीतेच्या अत्याचारात कारागृहातून जामीनावर सुटला तिच्यावरच पुन्हा अत्याचार केल्याने पिडीता गर्भवती राहिली. यातून तिने जन्म दिलेल्या बाळाचा जिल्हा रुग्णालयात (Jalgaon Civil Hospital) मृत्यु झाला. याबाबत जिल्हापेठ पेालिसांत (Police) संशयीत मयुर रमेश कोळी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. (jalgaon news Released on bail and girl tortured again)
जामनेर पोलिस (Jamner Police) ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे. मयुर रमेश कोळी (वय २१) याने गोडीगुलाबीने लग्नाचे आमीष दाखवत पिडीतेला सुरत येथे पळवून नेत अत्याचार केले होते. पिडीतेच्या आजोबांनी दिलेल्या तक्रारीवरुन मयुर कोळी याच्या विरोधात अपहरणासह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात संशयित मयुर यास अटक करण्यात आली होती. कारागृहातून नंतर त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली.
त्याने पुन्हा केला अत्याचार
जामीनावर सुटका झाल्यानंतर जून ते जुलै २०२१ या काळात मयुर याने पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीशी शारिरीक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला. तुझ्या घरच्यांना सांगितले तर तुला ठार मारेन अशी धमकी देत मयुर याने मुलीवर वेळावेळी अत्याचार केले. या दरम्यान पिडीतेचा पाय भाजला. पायावर उपचार सुरु असतांना ती गर्भवती असल्याचे वैद्यकीय उपचारादरम्यान निदर्शनास आले.
बाळाचा मृत्यू
पिडीतेला पुढील उपचारासाठी जळगावी खासगी क्रिटीकल केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येवून तिची प्रसूती झाली. बाळ कमी दिवसाचे असल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) हलवण्यात आले. उपचार सुरु असतांना सोमवारी (३१ जानेवारी) पिडीतेने जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन अत्याचार करणार्या संशयित मयुर कोळी याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.