रेशन प्रणालीने जन्माला घातला नवीन व्यवसाय; गहू तांदूळ आहे का..सकाळीच गल्लीत घुमतो आवाज

रेशन प्रणालीने जन्माला घातला नवीन व्यवसाय; गहू तांदूळ आहे का..सकाळीच गल्लीत घुमतो आवाज
Ration
Ration

सावदा (जळगाव) : सरकारी भ्रष्ट व्यवस्थेतून कधी कोणता नवीन धंदा उदयास येईल हे सांगता येत नाही. आता हेच बघा ना. सकाळची सहाची वेळ..कोंबडा आरवतो व जाग येते तसा कानी आवाज पडतो; गहू तांदूळ आहे का..गहू तांदूळ.. आश्‍चर्य वाटले ना? हे भिकारी वैगेरे तर नाही. तर हा नवीन धंदा आहे हो. कारण गहू तांदूळ घेता का हा धंद्याचा आवाज समजू शकतो. पण गहू तांदूळ आहे का? हे समजणे जरा अवघडच. तर काय आहे हा प्रकार ते वाचा. (jalgaon-news-ration-system-a-new-businesses-there- wheat-or-rice-sale)

गहू– तांदूळ आहे का..या आवाजाबाबत चाचपणी केली असता, यूपीए २ या केंद्रातील सरकारने २०१४ चे मुदत संपण्याचे अखेरीस चांगल्या हेतूने २ रूपये किलोने धान्य देण्याची अन्न सुरक्षा योजना आणली. योजना तशी चांगलीच आहे. कारण हरित क्रांतीमुळे देश तसा अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याने ते धान्य गोदामात खूप शिल्लक असते. ते खराब होऊन वाया जाण्याऐवजी ते गरिबांना स्वस्त किंमतीत द्यावे; या हेतूने ही अंत्योदय योजना तत्कालीन सरकारने आणली असावी. या योजनेत काही गरिबांना धान्य मिळतही आहे. पण या योजनेत भलतचं काही घडत आहे.

अंत्‍योदर योजनेचा फायदा

ही योजना राबविताना जिल्हा तालुका व ग्राउंड लेव्हलवर मात्र गरिबांच्या याद्या तयार करताना घोळ करण्यात आला आहे. आजही या यादीत आपले नाव घुसवून काही लोक फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अंत्योदय यादीत समाजातील काही अशा गरीब लोकांची नावे आहेत की ती वाचली तर डोक्याला हात लावण्याशिवाय पर्याय नाही.

विशिष्‍ट दिवसात गल्‍लीत येतो आवाज

मूळ मुद्दा हा की गल्लीतून येणारा आवाज गहू, तांदूळ आहे का? याचा अर्थ हा की नवीन व्यवसाय आहे. तो म्हणजे ज्यांना स्वस्त धान्य ज्या महिन्यात ज्या दिवसात मिळते. अगदी त्याच दिवसात हा आवाज वाहनासह गल्लीतून घुमतो. गल्लीतील चौकात माल गाडी उभी राहते आणि दोन तीन लोक मग गल्ली बोळात नेहमीच्या ठिकाणी जाऊन आवाज देऊन स्वस्त धान्य खरेदी करतात. नेहमी ठरल्याप्रमाणे समाजातील गरीब लोक (मनाने गरीब पैशाने नाही) त्यांना मिळालेले स्वस्त धान्य ते पटापट इकडे तिकडे पाहून जास्त भावाने आलेल्या खरेदीदाराला विकून टाकतात. कारण त्याला माहित आहे की, आपल्या शेजारी व समोरच्या गरीब कुटुंबाला हे धान्य मिळत नाही. पण आपल्याला मिळत आहे.

Ration
कोब्रा असो की बिनविषारी साप; त्‍यांची निडर पकड.. त्‍यांनी दिले अडीच हजारांहून अधिक सापांना जीवदान

विकत घेणाऱ्यालाही मिळतेय स्‍वस्‍त

विकत घेणाऱ्यालाही ते मार्केट भावापेक्षा जरा स्वस्तच मिळते. त्यामुळे तेही त्यातून बराच नफा कमवत आहे. लाभार्थीच्या हाती येण्याआधी रेशन वितरण प्रणालीत भ्रष्टाचार नव्हता अस नाही. पण आता तर लाभार्थी सुद्धा त्याच मार्गावर जात आहेत की काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कारण आपल्याला मिळालेले स्वस्त धान्य हे आपण गरीब म्हणून आपले पोट भरण्यासाठी दिलेले आहे. पण ज्यांना या धान्याची गरज नसताना ते लाभ घेत आहे.

कोरोनातील मोफत धान्‍याचा झाला अधिक साठा

गल्लीत केव्हाही फेरी वाल्यांचा आवाज येतो, तो म्हणजे त्यांनी आणलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी. पण हा आवाज जरा वेगळ्याच कारणासाठी अर्थात गहू तांदूळ आहे का? तेही रेशनचे यासाठी. कारण आजही अशी अनेक गरीब कुटुंबे आहेत की ते या योजनेपासून वंचित आहे. काही भलतेच जमीनदार, नोकरदार, व्यवसायिक, काही आजी माजी लोकप्रतिनिधी आदी या योजनेचा लाभ घेत आहेत. गेल्या दीड वर्षात तर कोरोना काळात तर मोफत धान्य दिले गेल्याने ज्या कुटुंबात जास्त सदस्य आहेत. त्या घरात पोत भरून स्वस्त धान्य गोळा झाले. त्याची विल्हेवाट त्यांनी घर बसल्या विकून केली. यामुळे आता तरी पुढे ही योजना राबविताना प्रत्यक्ष सर्वेक्षण होऊन जे खऱ्या अर्थाने गरीब आहेत त्यांनाच हे धान्य मिळाले पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com