जमिनीच्‍या वादातून गोळीबार; एक जण जखमी

गोळीबार जमिनीच्‍या वादातून झाल्‍याची माहिती समोर येत आहे.
gun firing
gun firing

भडगाव (जळगाव) : पळासखेडा (ता. भडगाव) येथे गोळीबार झाल्याची घटना घडली. यात एक जण जखमी झाला आहे. (jalgaon-news-palaskheda-Firing-over-land-disputes-One-person-was-injured)

भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथे एकावर गोळीबार झाला. मात्र हा गोळीबार जमिनीच्‍या वादातून झाल्‍याची माहिती समोर येत आहे. यात अशोक शिवाजी पाटील यांच्यावर विजय दोधा पाटील यांनी गोळीबार केल्‍याने अशोक पाटील हे जखमी झाले आहेत. यामुळे परिसर हादराला आहे.

gun firing
म्‍हणूनच खानदेश राहतोय तहानलेला; वर्षानुवर्षाचा प्रश्‍न सुटेना

जुन्‍या वादाचे कारण

जमिनीचा जुना वाद आहे. यात अशोक पाटील व विजय पाटील यांच्‍यात जमिनीचा वाद आहे. दोघांमध्‍ये आज सकाळी पुन्हा एकदा वाद झाला. यात विजय पाटील यांनी पिस्तुल काढत फैरी झाडल्या. यामध्‍ये सदर गोळीबारात अशोक पाटील हे जखमी झाले असून त्यांना तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com