ग्रामसेवकासह सरपंचपतीस सहा हजारांची लाच भोवली; रोजगार सेवकाकडून केली मागणी

ग्रामसेवकासह सरपंचपतीस सहा हजारांची लाच भोवली; रोजगार सेवकाकडून केली मागणी
Bribe
BribeSaam tv

पाचोरा (जळगाव) : वरसाडे प्र. पा. (ता. पाचोरा) येथील ग्रामसेवक व सरपंचांच्या पतीने सहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात (Bribe) लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (jalgaon news pachora panchayat samiti gram sevak collected a bribe of six thousand)

Bribe
Crime: डोक्‍यात दगड टाकून तरूणाचा खून

वरसाडे प्र. पा. (ता. पाचोरा) येथे नियुक्तीस असलेले ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे (वय ५२) यांच्याकडे ग्रामग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या रोजगार हमी योजनेवर रोजगार सेवक म्हणून केलेल्या कामाचे मानधन धनादेशावर सही करण्याची विनंती केली. त्यांनी स्वतःसाठी व तटस्थ व्यक्ती सरपंचपती शिवदास भुरा राठोड (वय ६७) यांच्यासह सहा हजार (Jalgaon News) रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. तक्रारदाराने लगेचच जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली.

सापळा रचत पकडले

प्राप्‍त तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. त्यानुसार, तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ग्रामसेवक काशिनाथ सोनवणे व सरपंचपती शिवदास राठोड यांना रंगेहात पकडले. ही कारवाई (Nashik News) नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत विभागाचे पोलिस (Police) अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक एन.एस. न्याहळदे, पोलिस अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस एन. एन. जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज कोळी, जनार्दन चौधरी, सुनील शिरसाट, प्रवीण पाटील, महेश सूर्यवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली. यामुळे पंचायत समिती प्रशासन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com