मुलाला फोन करून आत्‍महत्‍येचे सांगितले अन्‌ पित्याने घरात घेतला गळफास

मुलाला फोन करून आत्‍महत्‍येचे सांगितले अन्‌ पित्याने घरात घेतला गळफास
गळफास
गळफास
Published On

पाचोरा (जळगाव) : अंतुर्ली खुर्द (ता. पाचोरा) येथील शेतमजूर असलेल्या ५७ वर्षीय पित्याने मामाच्या गावी गेलेल्या मुलास भ्रमणध्वनीवरून आत्महत्या करीत असल्याचे सांगून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराने गोसावी कुटुंबीय कमालीचे खचले आहेत. (jalgaon-news-pachora-father-called-the-boy-and-told-him-that-he-had-committed-suicide)

अंतुर्ली खुर्द येथील ईश्वर गोसावी हे पत्नी व मुलांसह शेतमजुरीची कामे करतात. शनिवार (ता. १८) सकाळी त्यांची पत्नी व दोन्ही मुले तारखेडा (ता. पाचोरा) येथे मामाच्या गावी गेले होते. ईश्वर गोसावी घरी एकटेच होते. त्‍यांनी आज (ता. १९) पहाटे पाचच्या सुमारास मुलगा गणेशच्या भ्रमणध्वनीवर 'मी आत्महत्या करीत आहे..’ असे कळविले. पित्याचे हे वाक्य ऐकून मूलगा गणेश याने तुम्हाला काय त्रास आहे? असे काही करू नका आम्ही आलोच.. असे समजावण्याचा प्रयत्न करत असतानाच ईश्वर गोसावींनी फोन बंद केला. लगेचच त्यांनी घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेतला.

गळफास
..अन् आईची भेट ठरली शेवटची

तोपर्यंत सारे संपले होते

पत्नी व दोन्ही मुले लगबगीने अंतुर्ली येथे घरी परतले. तोपर्यंत ईश्वर गोसावी यांनी गळफास घेतलेला होता. त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून गोसावी कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांना लगबगीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. अमित साळुंखे यांनी पोलिसांना कळवुन शवविच्छेदन केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत ईश्वर गोसावी यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, दोन मुले असा परिवार असून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न गोसावी कुटुंबीयांसह ग्रामस्थ करीत आहेत. पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुर्यकांत नाईक, नरेंद्र सुरवाडे तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com