Hatnur Dam
Hatnur Dam

प्रकल्पांमधून वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजनच नाही; दोनशे टीएमसी पाणी समुद्रात

प्रकल्पांमधून वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजनच नाही; दोनशे टीएमसी पाणी समुद्रात
Published on

जळगाव : शेवटच्‍या दोन महिन्‍यात अतिवृष्टी झाल्‍याने १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सर्वच प्रकल्प भरले. यात हतनूर धरणातून पाच- सहा वेळा पूर्ण क्षमतेने विसर्ग झाला. परंतु या सर्वच प्रकल्पांमधून वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजन न झाल्याने यंदा देखील दोनशेवर टीएमसी पाणी वाहून समुद्रात गेले. (jalgaon-news-Not-planning-of-the-water-that-flows-through-the-dam-Two-hundred-TMC-of-water-in-the-sea)

लोकसभा निवडणुकीत या धरणाच्या अपूर्ण कामावरून राजकारण झाले, त्या वेळी महाजन यांनी पाडळसे धरणाला निधीची सुनामी येईल असे सांगत मते मिळवली. मात्र, त्सुनामी नाही पावसाचा जलप्रलय झाला तरी निधीची साधी लाटही आली नाही. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे धोरण भाजपा सत्तेच्या काळात रुढार्थाने पुढे आले. पण, जिल्ह्यात पाणी अडविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पाला निधीच मिळणार नसेल तर वाहून वाया जाणारे पाणी जिरवणार तरी कुठे असा प्रश्न आहे.

Hatnur Dam
Nandurbar : आयान साखर कारखान्‍यात दुसऱ्या दिवशीही तपासणी सुरूच

तापीच्या पाण्याचा दरवर्षीचा प्रश्‍न

हतनूर धरणांमधून सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे. दहा मध्यम प्रकल्पही पूर्ण भरलेत. त्यामुळे अतिरिक्त पाणी वाया जात आहे. तापी ही जिल्ह्यातील महत्त्वाची नदी, मध्य प्रदेशातली पूर्णा जळगावच्या तापीला येऊन मिळते. पुढे ती गुजरातमधून प्रवास करत अरबी समुद्रास जाऊन मिळते. ५० वर्षांपूर्वी भुसावळमध्ये हतनूर धरण बांधले गेले. भुसावळ रेल्वे, शहर, दीपनगर वीज प्रकल्प, भुसावळ, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, जळगाव एमआयडीसी या भागांना हतनूरमधून पाणी पुरवठा होतो. परंतु, पावसाळ्यात वाहून जाणार पाणी अडविण्यासाठीचे नियोजन होत नसल्‍याने पाणी वाहून जात असते.

पाडळसे, शेळगावही अपूर्ण

तापीवर बांधण्यात येणाऱ्या पाडळसे प्रकल्प आणि शेळगाव बॅरेज यांना वीस वर्षांचा काळ उलटूनही पूर्ण होत नाही. याउपर शासकीय अनास्था आणि राजकीय उदासीनता काय असावी? तापीचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी १९९५-९६ मध्ये अमळनेर तालुक्‍यातील पाडळसे येथील प्रकल्पासाठी ४२.२० कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली. यामुळे १४.४० टीएमसी पाणी अडविले जाणार होते. तर अमळनेर, चोपडा, धरणगाव, पारोळा, धुळे, शिंदखेडा तालुक्यांना त्याचा लाभ होणार आहे. अमळनेर, पारोळा, चोपडा हे तालुके ‘डार्क झोन’मध्ये असल्याने येथील भूजल पातळीत वाढ होण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पाकडे गंभीरपणे पाहिले गेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com