अन्यथा पाचशे रुपये दंड भरा; जिल्हाधिकारी राऊत यांचे आदेश

अन्यथा पाचशे रुपये दंड भरा; जिल्हाधिकारी राऊत यांचे आदेश
Mask use
Mask use
Published On

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय व खासगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर करणे, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत आदेश लागू करण्यात आले. (jalgaon-news-no-mask-use--pay-a-fine-of-five-hundred-rupees-Order-of-Collector-abhijit-Raut)

धार्मिकस्थळे व प्रार्थनास्थळे, नाट्यगृहे, बंदिस्त सभागृहे/मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम व चित्रपटगृहे, अम्युझमेंट पार्क, इंडस्ट्रीज हे सुरू करण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले असून, त्यानुसार सुधारित आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय व खासगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी/कर्मचारी व कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या सर्व अभ्यागतांना कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक, तोंड पूर्णतः झाकले जाईल, अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे.

पाचशे दंडाच्‍या सुचना

सर्व कार्यालय व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणारे अभ्यांगत, कर्मचारी, अधिकारी यांना संबंधित अभ्यागत/कर्मचारी/अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात/आवारात विनामास्क आढळतील त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी (कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी)यांनी पाचशे रुपये दंड करण्याच्या सूचना आहेत.

Mask use
युवासेनेची सायकल रॅली..पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध

आरोग्य विभागाने ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत सर्वांनाच मास्क वापरणे गरजेचे केले आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com