जळगाव : शेमळदे (ता. मुक्ताईनगर) गावातील अवघ्या १६ वर्षांच्या अर्चन चिंतामण पाटील या ग्रामीण भागातील मुलाने पेट्रोलचे भाव जास्त वाढल्यामुळे इलेक्ट्रिक बॅटरीच्या साह्याने चालणारी चार चाकी गाडी बनवली आहे. (jalgaon-news-muktainagar-lockdown-school-closed-and-10th-standerd-student-create-electric-car)
अर्चन हा मुक्ताईनगर येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून लॉकडाऊनच्या काळात त्याने घरीच ही गाडी तयार केली आहे. त्याला ही कल्पना सायकलवरून सुचली. ही कल्पना प्रत्यक्षात उतरवून बॅटरीवर चालणारी चारचाकी गाडी साकारली.
सायकलचे ब्रेक अन् मोटारसायकलचे ॲक्सीलेटर
तयार केलेल्या चारचाकी गाडीत २४ व्हॉल्टची एक बॅटरी आहे. त्यासाठी व ४५ एंपिअरच्या बॅटरी त्याने वापरली असून ती साधारणतः ट्रॅक्टर किंवा कारसाठी वापरली जाते. बॅटरी जोडणीचे ज्ञान त्याने घरीच यूट्यूबवरून घेतले. ही गाडी सायकलचे ब्रेक व मोटारसायकलचे एक्सलेटर वापरून तयार केली. प्लायवूडचा वापरही केला आहे. ही गाडी गिअरच्या साह्याने पुढे व मागे नेता येते. ताशी २० कि.मी. प्रति तास असा तिचा वेग आहे. अत्यंत कमी म्हणजे अवघ्या ३० हजारांत त्याने ही गाडी तयार केली आहे.
व्हॉइस कमांडवरील रोबोट
लहानपणापासून अर्चन यास विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याची आवड आहे. लहानपणी मुले जशी ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी, दुचाकी बनवतात; त्याप्रमाणे अर्चन हा त्या वस्तू रिमोटच्या सहाय्याने बनवायचा. त्याने मोबाइलवर व्हॉइस कमांड देऊन एक रोबोटही तयार केला. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्याने केलेल्या या रोबोटमुळे त्याचा प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले होते.
शाळा बंद मात्र संशाधन सुरू
लहानपणापासूनच गाडी बनवण्याची आवड असणाऱ्या अर्चनचे वडील आरोग्य सेवक आहे. ग्रामीण भागात राहणारा अर्चन शिक्षणासाठी रोज मुक्ताईनगरला ये- जा करतो. परंतु सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने घरीच आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याने घरातीलच वस्तूंपासून ही कार बनवली. संशोधनाची आवड पाहून त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे पुढे सोलर पॉवर कार बनवण्याचे अर्चनचे ध्येय आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.