जळगाव : माझा छंद हा पूर्वीपासूनच अध्यात्माचा असून गाणे म्हणणे, कव्वाली म्हणणे, नाटकात काम करण्यासह अध्यात्मिकतेची मला खुप आवड आहे. कदाचीत मी जर अध्यात्माकडे गेलो असतो; तर नक्कीच किर्तनकार झालो असतो; असे मत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त केले आहे. (jalgaon news minister Gulabrao patil statement for kashmiri pandit)
जिल्ह्याचे (Jalgaon News) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, की किर्तनकार व्हायला काहीच अडचण नव्हती. माझा आवाजही चांगला आहे आणी मी त्या चार ओळी कधीही म्हणू शकतो; असे मतही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. (Gulabrao Patil Latest Marathi News)
केंद्र सरकार अपयशी
काश्मीर पंडितांच्या मागे संपूर्ण देश आहे. जरी आज त्यांची हत्या होत असली तरी ही बाब अत्यंत निंदनीय आहे. याकरता केंद्र सरकारने कश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandit) मागे उभे राहून त्यांना मदत करून प्रत्येक राज्याने देखील पंडितांच्या मागे उभे राहिले पाहिजे. मात्र यात केंद्र सरकार अपयशी ठरले असून या सर्व अतिरेकी कारवाया असून यात प्रामुख्याने केंद्र सरकारचे लक्ष जास्त द्यावे अशी अपेक्षा आहे. यातूनच काहीतरी होऊ शकते; असे मत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.