लाखो रूपये किंमतीची तांब्याची तार चोरी; दुकानाचे शटर तोडून मारला हात

लाखो रूपये किंमतीची तांब्याची तार चोरी; दुकानाचे शटर तोडून मारला हात
Theft
Theft
Published On

जळगाव : मेहूणबारे (ता.चाळीसगाव) येथे धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाची पट्टी वाकवून कुलूप तोडून लाखो रूपये किंमतीच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. दुकानदार दुकानात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. (jalgaon-news-mehunbare-electrical-shop-Theft-of-copper-wire-worth-millions-of-rupees)

मेहूणबारे बसस्थानक परिसरात राहूल धामणे यांचे श्री गुरूदत्त इलेक्ट्रीक दुकान आहे. श्री. धामणे रात्री दुकान बंद करून घरी गेले. सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या कुलपाजवळील पट्टी वाकवलेली तसेच कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. धामणे यांनी आत दुकानात जावून पाहीले असता इलेक्ट्रीक मोटार वायडिंग तांब्याच्या तारांची चोरी झाल्याचे दिसून आले. जवळपास सहा ते सात लाखाची वायडिंग तांब्याची तार चोरट्यांनी लंपास केल्याचे बोलले जात आहे.

दोन दिवसांपुर्वीच आणला होता माल

या चोरीच्या घटनेची माहिती धामणे यांनी मेहूणबारे पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी येऊन चोरीचा पंचनामा केला. दुकानदार राहूल धामणे यांनी सोमवारीच मालेगाव येथून तीन लाख रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा आणल्या होत्या आणि दुकानात आणखी चार लाख रूपये किंमतीचा माल दुकानात होता. रात्री या तारा चोरट्यांनी लंपास केल्या यावरून दुकानदार धामणे हे दुकानात माल कधी आणणार याची चोरट्यांना माहीत असावी याची पाळत ठेवून ही चोरी केली गेली असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या तांब्याच्या तारा एकट्या दुकट्या चोराने चोरून नेल्याचे संभवत नाही. वाहनातून किंवा चोरांच्या टोळीनेच हा डाव साधला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Theft
बहिणाबाईंची ‘अरे संसार संसार..’ कविता चक्क तव्यावर चित्रीत!

चोरांचा सुळसुळाट

मेहूणबारे परीसरात गेल्या काही दिवसापासून चोरांचा सुळसुळाट वाढला आहे.यापूर्वीही वरखेडे, बहाळ शिवारात चोरट्यांनी शेतातील इले्नट्रीक मोटारी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दावणीला बांधलेली गुरेही चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या चोऱ्या व चोरट्यांचा तपास लावण्यास पोलीस हतबल ठरले आहेत. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com