वैद्यकीय अधिकाऱ्यास सक्तमजुरीसह पाच हजारांचा दंड; विनयभंगप्रकरणी शिक्षा

वैद्यकीय अधिकाऱ्यास सक्तमजुरीसह पाच हजारांचा दंड; विनयभंगप्रकरणी शिक्षा
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

पहूर (जळगाव) : ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र प्रल्हाद वानखेडे यांना सहकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी जामनेर (Jamner) न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. (jalgaon news Medical officer fined Rs five thousand including hard labor)

Jalgaon News
बर्निंग कारचा थरार..पेटती कार ढकलत नेली

पहूर येथील ग्रामीण (Hospital) रुग्णालयात २ जून २०२१ ला पीडिता कर्तव्यावर असताना आरोपी डॉ. जितेंद्र प्रल्हाद वानखेडे हा त्याची ड्यूटी नसताना रात्री साडेबाराच्या सुमारास रुग्णालयात आला व पीडिता आराम करत असलेल्या खोलीचा दरवाजा ठोकून तिला दार उघडण्यास सांगितले व तिला आरोपीच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने पीडितेसाठी रोस्टेड चिकन आणले, असे सांगितले. पीडितेने त्यास नकार दिला असता तो वारंवार तिला चिकन खाण्यासाठी आग्रह करत होता. आरोपी दारूच्या (Jalgaon News) नशेत असल्याने पीडितेने पार्सल ताब्यात घेऊन परत दार लावून घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा आरोपीने तिला रात्री एकच्या सुमारास फोन करून व्हॉट्सअॅपवर यायला सांगितले. त्यानंतर आरोपी पुन्हा रात्रभर तिला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता. वारंवार आरोपी मेसेज करून त्रास देत असल्याने पीडितेने तिच्या सहकारी डॉक्टरांना फोन करून ही हकीगत सांगितली असता, त्यांनी त्या ठिकाणी येऊन आरोपीस बाहेर काढून पीडितेला आतून दार लावण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीने पहूर पोलिस (Police) ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली.

जामनेर न्‍यायालयात खटला

हा खटला जामनेर येथील न्यायाधीश डी. एन. चामले यांच्यासमोर चालला. सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासले. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे यांनी केला होता. सरकार पक्षातर्फे कृतिका भट यांनी युक्तिवाद करून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, जेणेकरून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना जरब बसेल व त्याचा समाजात चांगला संदेश जाईल. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद मान्य करून आरोपी वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे यास वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सरकारी वकील कृतिका भट यांना पैरवी अधिकारी मनोज बाविस्कर व केसवॉच राजेंद्र रामलाल परदेशी यांनी मदत केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com