बर्निंग कारचा थरार..पेटती कार ढकलत नेली

बर्निंग कारचा थरार..पेटती कार ढकलत नेली
burning car
burning carSaam tv

शिरपूर (धुळे) : इंजिनभोवती आगीच्या ज्वाळा भडकलेल्या असतांना कार धाडसाने ढकलत नेऊन पाण्याच्या प्रवाहाखाली उभी करुन शिरपुरातील क्रांतीनगरच्या युवकांनी संभाव्य अनर्थ वाचवला. पेटत्या कारला (Burning Car) वाचवण्याचा हा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. (dhule news shirpur trembling of the burning car pushed the car)

burning car
लग्नानंतर दागिने, रोकड घेऊन नववधू फरार; पोलिसांनी वधूसह चौघांना अटक

शहराजवळ गुजर खर्दे (ता.शिरपूर) येथील रहिवासी सुनिल मोहन पटेल त्यांच्या कार (एमएच 43, एएन 1496) ने शिरपूरकडे येत होते. दुपारी क्रांतीनगरकडे जाण्यासाठी वळले असतांना त्यांना जळाल्याचा वास आला. त्यांनी कार तातडीने बंद केली. बाहेर जाऊन पाहिले असता बोनेटखालून इंजिनमधून धूर बाहेर पडत होता. काही क्षणांतच इंजिनाला आगीच्या ज्वाळांनी वेढले. गुजर यांनी मदतीसाठी विनंती केल्यानंतर क्रांतीनगरमधील युवक धावून गेले.

पेटती कार नेली पुढे ढकलत

क्रांतीनगरमध्ये नगरपालिकेचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे. तेथे स्वच्छ केलेले पाणी टँकरमध्ये भरुन देण्यासाठी मोठ्या स्टँड पाईपची सुविधा दिली आहे. युवकांनी प्रसंगावधान राखून पेटती कार स्टँड पाईपखाली उभी केली. प्रकल्पातील कर्मचार्‍यांना सांगून पाणी सुरु केले. संततधार पाणी पडू लागले. मात्र बॉनेट जाम झाल्याने पाणी इंजिनपर्यंत पोहचत नव्हते. परिसरातून बादल्या आणून पाण्याचा मारा सुरु झाला. त्यासोबतच लाकडी दांड्याने बॉनेट उचकटून काढण्यात आले. त्यानंतर आग विझली. मात्र या दुर्घटनेत वायरलूम जळाले असून अन्य तोडफोडीमुळे कारचे बरेच नुकसान झाले. उन्हामुळे इंजिनमध्ये आग लागल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com