Load Shedding
Load SheddingSaam tv

आपत्‍कालीन भारनियमनाच्‍या नावाने महावितरणचा खेळ; मध्यरात्री होतेय बत्‍ती गुल

आपत्‍कालीन भारनियमनाच्‍या नावाने महावितरणचा खेळ; मध्यरात्री होतेय बत्‍ती गुल
Published on

जळगाव : भारनियमन केव्हा होईल, हे आता सांगता येत नाही, शहरातील काही भागात तर मध्यरात्री दीड ते सकाळी सात वाजेपर्यंत भारनियमन होत आहे. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे घरातील पंखाही बंद होत असेल तर सर्व सामान्य नागरिकांना घर उघडे ठेवून जागे राहण्याशिवाय पर्यायच नसतो. सद्या मध्यरात्री निघणारे हे ‘भूत’ उकाडा करीत नागरिकांच्या मानगुटीवर बसले आहे, त्यामुळे महावितरण (MSEDCL) आणि शासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे. (jalgaon news mahavitaran emergency load shedding It is midnight)

Load Shedding
वीजबिलची होळी..अन्यायकारक वीजबिल विरोधात कृती समितीचे आंदोलन

राज्यात वीज भारनियमन करण्याची घोषणा शासनाच्या उर्जा विभागातर्फे करण्यात आली आहे. त्यानुसार महावितरणतर्फे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातही भारनियमन करण्यात येत आहे. सात तासाचे हे भारनियमन कोणत्या भागात केव्हाही करण्यात येत आहे. जळगाव शहरातील काही भागात तर हे भारनियमन मध्यरात्रीही करण्यात येत आहे. शाहूनगर, दूध फेडरेशन परिसर, निमखेडी शिवार व्दारकानगर, महावीरनगर, शिवाजीनगर तसेच काळेनगर यासह इतर भागात हे भारनियमन मध्यरात्री दीड ते सकाळी सात वाजेपर्यंत होत असते.

मध्यरात्रीच्‍या भारनियमनाचा खेळ

महावितरण कंपनीने मध्यरात्री दीड ते सकाळी सात वाजेपर्यंत होणारे भारनियमन त्वरित बंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच सलग तास भारनियमन न करता दोन दोन तासाचे भारनियनमन करावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. महावितरणचे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com