Jalgaon
JalgaonSaam tv

गुरू-शुक्राच्या महायुतीचा रविवारी दिसणार नजारा

गुरू-शुक्राच्या महायुतीचा रविवारी दिसणार नजारा
Published on

जळगाव : खगोलीय घटनांमध्ये रविवारी (ता. १) पहाटे पूर्व दिशेला गुरू आणि शुक्र ग्रहांच्या महायुतीचा (Great Conjunction) विलक्षण अनुभव पाहण्याचा योग आहे. चार वाजून १५ मिनिटांपासून हे दृश्य आपल्याला बघायला मिळेल. (Jalgaon news Jupiter Venus alliance will be seen on Sunday)

Jalgaon
बारा एकरांवरील ऊसाला आग; पंधरा लाखाचे नुकसान

सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरू आणि सगळ्यात तेजस्वी दिसणारा शुक्र हे एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आपल्याला दिसणार आहेत. दर वर्षी ते जवळ येतात, पण या वेळी ते एकमेकांच्या खूपच जवळ आलेले दिसणार आहेत. साध्या डोळ्यांनी तर ते दिसतीलच, पण टेलिस्कोपमधून गुरू त्याच्या चार चंद्रांसह आणि शुक्र यांना एकाच वेळी बघता येणार आहे.

युती आणि महायुती म्हणजे काय?

ज्या वेळी दोन ग्रह किंवा चंद्र आणि ग्रह एकमेकांजवळ येतात, त्याला ‘युती’ (Conjunction) म्हणतात. पण ते जेव्हा खूपच जवळ आलेले म्हणजे एकमेकांना चिटकल्यासारखे वाटतात त्यास ‘महायुती’ (Great Conjunction) म्हणतात.

पहाटेची वेळ असली, तरी आपल्या साखरझोपेशी थोडी तडजोड करून हा विलक्षण नजारा सर्वांनी बघावा.

-अमोघ जोशी, खगोल अभ्यासक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com