Leopard
Leopard saam tv

वाहनाच्‍या धडकेत बिबट्याचा मृत्‍यू

वाहनाच्‍या धडकेत बिबट्याचा मृत्‍यू
Published on

जामनेर (जळगाव) : शहरापासून जवळच दीड किलोमीटर अंतरावर बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्‍यू झाल्याची घटना घडली. जामनेरकडून (Jamner) बोदवडकडे जाणाऱ्या मार्गावर ही दुर्घटना घडली. (jalgaon news jamner Leopard dies in vehicle crash)

Leopard
Crime News: सातारा परिसरात महापालिका कर्मचाऱ्यास नागरिकांनी दोन तास ठेवलं डांबून

जामनेर ते बोदवड (Bodwad) मार्ग या राखीव वनक्षेत्राच्या अगदी लगत आहे. या राखीव वन क्षेत्रात आणखी पाच बिबटे आहेत अशी माहिती वन खात्याकडून (Forest Department) देण्यात आली. सदर घटनेबाबत काही प्रत्यक्षदर्शींनी याची माहिती वन खात्याच्या कार्यालयाला दिली. माहिती मिळाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित यांच्या सूचनेवरून वनरक्षक ठोंबरे, पी. एस. भारुडे, प्रशांत पाटील, वनपाल सुनील पाटील, प्यारेलाल महाजन, विकास गायकवाड, वनमजूर चरणदास चव्हाण, विजय चव्हाण आदींनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा (Leopard) मृतदेह ताब्यात घेतला.

शवविच्‍छेदन करून अंत्‍यसंस्‍कार

बिबट्याचा मृतदेह वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात आणला. बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्‍यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बिबट्याला धडक दिलेला वाहन चालक फरार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com