जामदा हाणामारी..अप्पर पोलीस अधीक्षक अँक्शन मोडवर

जामदा हाणामारी..अप्पर पोलीस अधीक्षक अँक्शन मोडवर
जामदा हाणामारी..अप्पर पोलीस अधीक्षक अँक्शन मोडवर

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : जामदा (ता.चाळीसगाव) येथे टपरी व दुकाने ठेवण्यावरुन वाद उफाळला असून दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. मेहुणबारे पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज पदभार स्वीकारताच चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दुपारी जामद्यात दंगलग्रस्त भागात भेट देवून दोन्ही गटांच्या नागरीकांशी संवाद साधून गावात शांतता ठेवण्याचे आवाहन केले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांला कुठलाही थारा दिला जाणार नाही. कठोर शासन केले जाईल तसेच गुन्ह्याचा तपास योग्य रितीने करण्यात येईल; अशी ग्वाही त्यांनी यावेळी चोपडे यांनी दिली. (jalgaon-news-jamda-village-two-groups-heating-and-police-officer-action-mode)

अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सकाळी मेहूणबारे पोलीस ठाण्यात भेट देवून जामद्याच्या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर जामदा गावात ज्या भागात दंगलीचा प्रकार घडला त्या भागाची पाहणी केली व दोन्ही गटांतील नागरीकांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे, उपनिरीक्षक योगेश ढिकले आदी उपस्थित होते.

गावात शांतता राखण्याचे आवाहन करीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सुचना केल्या. कायदा कुणीही हातात घेऊ नये, जर कुणी कायद्याचे उल्लंघन केले त्याला थारा दिला जाणार नाही, कठोर शासन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान येथे गावात शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगलीतील गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेचे धाडसत्र सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जामदा हाणामारी..अप्पर पोलीस अधीक्षक अँक्शन मोडवर
जिल्हा परिषद पोटनिवडणुक; पंधरा गटातून १०७ तर तीस गणातून १८० उमेदवारी अर्ज

पोलीसांना सहकार्य करा

दरम्यान मेहूणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी गावात कुणी कायदा हातात घेऊ नये, पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेस सोशल मीडियाचा अतिरेकपणा टाळावा कोणीही समाजविघातक अफवा पसरवू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com