अखेर अतिवृष्‍टीच्‍या मदतीत जळगाव जिल्ह्याचा समावेश होणार

अखेर अतिवृष्‍टीच्‍या मदतीत जळगाव जिल्ह्याचा समावेश होणार
अतिवृष्‍टी
अतिवृष्‍टी
Published On

भडगाव (जळगाव) : शासनाने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या १४ जिल्ह्यातील शेतकर्याना २ हजार ८०० कोटीची मदत जाहिर केली होती. मात्र जळगाव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरचे नुकसान होऊनही या मदतीच्या यादीतुन जिल्ह्याला वगळण्यात आले होते. यासंदर्भात आज 'साम’च्या माध्यमातून आवाज उठवत जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसण्याची भुमिका मांडली. त्याची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडला. अखेल या मदत यादित जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतला. (jalgaon-news-Jalgaon-district-will-be-included-in-the-relief-of-excess-rainfall)

जळगाव जिल्ह्याचा या मदत यादित समावेश नसल्याने जिल्ह्यातील शेतकर्यावर अन्याय होता. या वृत्‍तानंतर आमदार किशोर पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची तत्काळ भेट घेऊन ही वस्तुस्थीती सांगितली. त्यावर पालकमंत्रीही संतप्त झाले. त्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय आक्रमकपणे मांडत जळगाव जिल्ह्याचा यादीत सामवेश करण्याची मागणी केली. तत्पूर्वी गुलाबराव पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही भेट घेऊन हा विषय मांडला. अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत जळगाव जिल्ह्याचाही समावेश करण्याबाबत निर्णय झाला.

दोन दिवसात नवीन निर्णय

पुढच्या दोन दिवसात मदतीबाबत नव्याने निर्णय निर्गमीत होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शेतकर्यानी सकाळ च्या जागल्याच्या भुमिकेचे कौतुक करत आभार मानले. दरम्यान आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन जळगाव जिल्ह्याचा समावेश कयण्याबात आग्रही मागणी केली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थीत होते.

अतिवृष्‍टी
थरारक..सुसाट कार झाली पलटी, त्यावर चढला ट्रक; तिघांचा मृत्यु

जळगाव जिल्ह्याचा मदतीच्या यादीत समावेश नसल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ उपमुख्यमंत्र्याची भेट घेऊन जळगाव जिल्ह्याचा या यादीत समावेश करण्याबाबत भुमिका मांडली. त्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीतही या अन्यायाविरोधात आक्रमक भुमिका मांडली. त्यावर जळगाव जिल्ह्याचा सभावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव

जळगाव जिल्ह्याचा मदत यादित समावेश नसल्याबाबत समजल्‍यावर तत्काळ पालकमंत्र्याची भेट घेउन वस्तुस्थिती मांडली. त्यावर त्यांनी आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडला. त्यावर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करून नव्याने निर्णय जाहीर मान्य केले आहे.

- किशोर पाटील, आमदार पाचोरा-भडगाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com