अभ्यासू व्यक्तीने दीड वर्षाच्या मुलावर बोलणे निषेधार्ह; गुलाबराव पाटील यांची ठाकरेंवर टीका
जळगाव : दीड वर्षाच्या मुलावर उद्धव ठाकरे यांच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीने टीका करणे हे निषेधार्ह आणि चुकीचे आहे. राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये; अशा प्रकारची टीका मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. (Jalgaon News Gulabrao Patil)
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यात (Dasara Melava) बाप मुख्यमंत्री, मुलगा खासदार व नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसल्याचे म्हटले होते. ठाकरे यांच्या या वक्तव्याबाबत गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रीया देताना ठाकरेंवर टीका केली आहे.
दीड वर्षाच्या मुलावर टीका करणे अतिशय चुकीचे आहे. उद्या आदित्य ठाकरे यांनाही मूलबाळ होणार आहे. त्यांनी अशी टीका करायला नको होती. सध्या सेनेच्या (Shiv Sena) दोन गटात धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? या विषयावर चर्चा सुरू आहे. मात्र खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांची संख्या बळाचा विचार करता धनुष्य आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.
एकतर्फी निर्णय घेणाऱ्या पार्ट्या चालणार नाही
भाजपने खंजीर खुपसल्यामुळेच आपण आघाडीसोबत गेल्याचे उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले होते. त्याला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे, की त्याबद्दल आमचे काही म्हणणे नव्हते. मात्र हवामान बदलले आहे. याचा अंदाज आल्याचे आम्ही त्यांना सांगितले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सध्या राजकीय क्षेत्रात सर्वांच्या भावना लक्षात घेऊन सार्वभौम निर्णय घेणे आवश्यक ठरते आणि अशाच पार्टी चालणार आहे. एकतर्फी निर्णय घेणाऱ्या पार्ट्या चालणार नाहीत. हे या लोकांनी सिद्ध केल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.