जळगाव : सोने– चांदीच्या दरात चढ– उतार सुरूच आहे. सध्या दररोज दराल होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. महिन्याच्या सुरवातीला ५२ रूपयांवर असलेल्या सोन्याच्या (Gold) दरात मागील काही दिवसात बदल झाला. आज अखेर सोने ५१ हजारांवर आले आहे. (Jalgaon Today Gold Price)
आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीला मागणी कमी व सोन्यात कमोडीटी मार्केटमधील हालचालींनी भाव (Gold Price Today) सातत्याने कमी- अधिक होत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, सोने व चांदीचे (Silver) दर कमी होत असल्याने गुंतवणूक दारांसाठी चांगली संधी आहे. याचा फायदा देखील अनेक जण उचलत असल्याचे पहावयास मिळत आहे.
असे बदलले सोन्याचे दर
सोने दर १ जुलैला ५२ हजारांवर होते. यानंतर सोन्याच्या भावात ६ जुलैपासून घसरण सुरु झाली. त्यावेळी सोने ५१ हजार ते ५१ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहिले. तर १९ जुलैला ते ५० हजार ९०० रुपयांवर आले. एक दिवस भाववाढ होत नाही तोच पुन्हा २१ जुलै रोजी ४०० रुपयांची घसरण झाल्याने ते ५० हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर आले. मात्र २२ रोजी त्यात ४०० रुपयांची व २३ जुलैला ३०० रुपयांची वाढ झाल्याने ते ५१ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.