Jalgaon: बुडणाऱ्या मुलींना वाचविले; वाचवायला गेलेला युवक गेला वाहून

बुडणाऱ्या मुलींना वाचविले; वाचवायला गेलेला युवक गेला वाहून
Jalgaon Girna River
Jalgaon Girna RiverSaam tv

जळगाव : गिरणा नदीपात्रात कांताई बंधाऱ्याजवळ असलेल्या नागाई जोगाई मंदिराजवळील पर्यटनस्थळी आलेल्या जळगावातील विद्यार्थी सेल्फी (Selfie) काढत होते. या सेल्‍फीच्या नादात नदीत पडलेल्या मुलींना वाचविताना वाचविणारा युवक नयन निंबाळकर (वय १७) मात्र वाहून गेला. (Jalgaon News Kantai Dam)

Jalgaon Girna River
Nandurbar: दुर्गम भागातील चांदसैली घाटात कोसळली दरड

जळगावातील (Jalgaon) शिवाजीनगर परिसरातील मिथिला सोसायटीमधील मुलांनी रविवारी (ता. ११) एकत्र येत पिकनिकचा बेत आखला होता. समवयस्क मित्र- मैत्रिणी दर सुटीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जात असतात. पालकांच्याच परवानगीने रविवारी १० ते १५ जणांचा ग्रुप कांताई बंधाऱ्याजवळील नागाई- जोगाई मंदिराजवळील (Girna River) गिरणा नदीपात्रावर पिकनिकला आले होते. या वेळी खडकावर उभे राहून योगिता दामू पाटील (वय २०) व समीक्षा विपिन शिरोडकर (वय १८) फोटोसेशन करीत होत्या. सेल्फी घेत असताना दोघी पाण्याच्या प्रवाहात कोसळल्या. त्यांना वाचविण्यासाठी योगिताचा लहान भाऊ सागर व सोबतच्या इतरांसह नयन योगेश निंबाळकर यांनी उड्या घेतल्या. योगिता व समीक्षा यांना बाहेर काढल्यावर सागरलाही वाचविण्यात आले. मात्र, नयन निंबाळकर पाण्याच्या प्रवाहात ओढला गेल्याने तो वाहून गेला. नयनचे वडील दूध फेडरेशन येथे नोकरीला असून, आई गृहिणी आहे.

पालक, पोलिसांची धाव

घडल्या प्रकाराची माहिती या मुलांसोबतच्या मित्रांनी त्यांच्या घरी कळविल्यावर पालकांसह तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समीक्षा, योगिता व सागर या तिघांना तातडीने जिल्‍हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघी मुलींची प्रकृती धोक्याबाहेर असून, सागरही रात्रीपर्यंत नॉर्मल होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com