Ganesh Festival: यंदा १८ फूट उंचीच्या मूर्ती; सोबत किंमतीही वाढल्‍या

गणेशोत्सवात यंदा १८ फूट उंचीच्या मूर्ती; सोबत किंमतीही वाढल्‍या
Ganesh Festival
Ganesh FestivalSaam tv

जळगाव : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायांच्या आगमनाला अवघे २५ दिवस उरले आहेत. यंदा कोरोनोचे (Corona) निर्बंधमुक्त गणेशोत्सव असल्याने गणेश भक्तांच्या उत्साहाला (Ganesh Festival) उधाण आले आहे. सोबतच मोठ्या उंचीच्या मूर्तींवर निर्बंध नसल्याने शहरात १० ते १८ फूट उंचीपर्यंत मूर्ती तयार करण्याच्या कामांना वेग आला आहे. लहान मूर्तींना तर रंगरंगोटीही सुरू झाली आहे. मोठ्या गणेश मंडळांनी आरास तयार करण्यासाठी मंडप उभारणीही सुरु केली आहे. (Jalgaon News Ganesh Festival)

Ganesh Festival
Jalgaon: बोरी धरणातून नदीत 451 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग

शहरात सुमारे आठ ते दहा ठिकाणी मूर्ती तयार करण्याचे कामे सुरू आहेत. मूर्तिकार सर्वसाधारण अर्धाफुटापासून पाच-सहा फूट उंचीपर्यंत मूर्ती तयार करीत आहेत. ज्या गणेशमंडळांनी (Jalgaon) यंदा मोठी आकर्षक मूर्ती तयार करण्याची ऑर्डर मूर्तिकारांना दिली आहे. तेच मूर्तिकार मोठी मूर्ती घडवीत आहे. काही गणेश मंडळांनी (Madhya Pradesh) मध्यप्रदेश, शेगाव येथे मूर्ती आणण्यावर भर दिला आहे. ते जसजसा गणेशोत्सव जवळ येईल, तसतशा मूर्ती आणणे सुरू होईल, अशी माहिती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली.

दरात दहा टक्के वाढ

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमतींवर जीएसटी लागू आहे. यामुळे मूर्ती घडविण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामतः मूर्तीच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती मूर्तिकार गणेश यादव यांनी दिली. कोरोना काळातच मूर्तीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र किमती वाढविण्यात आल्या नव्हत्या. यंदा मात्र सर्वच निर्बंधमुक्त असल्याने गणेशमूर्तीची अधिक विक्री होणार असल्याने मूर्तिकार व त्यांच्या कुटुंबीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com