जळगाव : गेल्या आठवडाभरापासून थंडी कायम आहे. रात्रीच नव्हे तर दिवसा देखील थंडी जाणवते. हा थंडीच्या कडाक्यात चार बेघरांचा जळगावात (Jalgaon) मृत्यू झाल्याचा अंदाज होता. परंतु, त्या चौघांचा मृत्यू हा वेगवेगळ्या आजारातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (jalgaon news four died of various diseases Explained in autopsy)
भीक मागून उदरनिर्वाह करत असलेले ते वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आले होते. शहरातील पांडे डेअरी चौक, निमखेडी रस्ता, रेल्वे स्टेशन (Railway Station) व जिल्हापेठ परिसर अशा ठिकाणी चौघे बेघर आढळून आले. त्यांचा मृत्यू हा वाढलेल्या थंडीमुळे झाल्याच प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्यानुसार त्यांचे मृतदेह शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) नेले होते. तेथे त्यांचे आज शवविच्छेदन झाले.
शवविच्छेदनात स्पष्ट
जळगवात वाढलेल्या गारठ्यात चौघे बेघर सापडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. यात चौघांचा मृत्यू हा थंडीने झाला नसून फुफ्फूस, लिव्हरचे आजार असल्याचे स्पष्ट झाल्याचे वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.