शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष; कमी खर्चात विद्यार्थ्यांनी केला प्रयोग

शुन्य उर्जेवर आधारित शितकक्ष; कमी खर्चात विद्यार्थिनीने केला प्रयोग
Cold Storage
Cold Storage
Published On

एरंडोल (जळगाव) : हनमंतखेडे सिम (ता.एरंडोल) येथील रहिवासी व के.के वाघ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी ऐश्वर्या संजय पाटील ह्या विद्यार्थिनीने शेतकऱ्यांसाठी कृषीमालासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शून्य उर्जेवर आधारित शितकक्ष निर्माण केले आहे. (jalgaon-news-erndol-student-Zero-energy-based-cold-storage-Experiments-performedby)

शेतकऱ्यांनी पिकवलेला कृषी माल नाशवंत असल्यामुळे त्याची त्वरित विक्री न झाल्यास खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेवून हनमंतखेडे सिम येथील रहिवासी व के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी ऐश्वर्या संजय पाटील हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांनी पिकवलेला कृषी मालाची साठवण करता यावी आणि भाववाढ झाल्यानंतर विकता यावा; यासाठी शून्य उर्जेवर आधारित शीतकक्ष उभारले आहे.

साठवणीचा कालावधी वाढविला जातो

विटा, बांबू, पाईप आणि खाली पोते याचा वापर करून शीतकक्षाची निर्मिती केली आहे. या शीतकक्षाचे बाहेरील वातावरण सुमारे दहा ते पंधरा अंश सेल्सियसने कमी असते. त्यामुळे शेतकरी या शीतकक्षात मालाची साठवण करू शकतात. या शीतकक्षात फळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आद्रतेमध्ये केल्यास साठवणीचा कालावधी वाढविला जातो. शीतकक्षातील साठवणुकीमुळे भाजीपाला, फळे जास्त काल टिकण्यास मदत होते.

Cold Storage
धक्‍कादायक..आईने मुलांना आधी पाजले विष; नंतर स्‍वतः घेतला गळफास

कमी खर्चात उभारणी

शीतकक्षासाठी कोणत्याही उर्जेचा वापर केला जात नाही. तसेच उभारणी कमी वेळेत आही कमी खर्चात करता येते. ऐश्वर्या पाटील हिने केलेल्या शीतकक्षासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशकुमार हाडोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार, प्रा. सुनील बैरागी, प्रा. निलेश गडगे यांनी मार्गदर्शन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com