इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सायकल रॅली

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सायकल रॅली
Jalgaon ncp
Jalgaon ncp
Published On

एरंडोल (जळगाव) : पेट्रोल, डीझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सायकल रॅली काढून तसेच राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. (jalgaon-news-erandol-Cycle-rally-by-NCP-against-fuel-price-hike)

राष्‍ट्रवादीच्‍या आदोलनानंतर माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील, जिल्हा सरचिटणीस अमित पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार यांच्या हस्ते प्रांताधिकारी विनय गोसावी यांना निवेदन देण्यात आले. रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली होती. सायकल रॅलीत माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्‍यासह पदाधिकारी सायकल चालवत सहभागी झाले होते.

भाजप आमदारांच्‍या गैरवर्तवणूकीचाही निषेध

इंधन दरवाढी विरोधात तसेच विधानसभेत भाजपच्या बारा आमदारांनी केलेल्या गैरवर्तवणूकीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावरील धरणगाव चौफुली येथे सकाळी अकराला रास्तारोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पाटील, डॉ. राजेंद्र देसले, राजेंद्र शिंदे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे इंधन दरवाढीचा भडका उडत असल्याचे सांगितले.

Jalgaon ncp
कुटुंब गाढ झोपेत अन्‌ काळोख्या रात्रीत कोब्राच्‍या थराराने श्‍वास रोखला

केंद्र सरकार अपयशी असल्‍याचा आरोप

जिवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून केंद्र सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली असून इंधन दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी अशी मागणी केली. विधानसभेत महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा सुरु असतांना भाजपच्या बारा आमदारांनी गैरवर्तन करून गोंधळ घातल्याचा यावेळी निषेध करण्यात आला. खतांच्या किंमतीत वाढ केल्यामुळे शेतकरी हतबल झाले असल्याचे सांगितले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. सुभाष देशमुख, जिल्हा सरचिटणीस अमित पाटील, उमेश देसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com